Monday, April 6, 2026
HomeTop Newsअखेर जावली तालुक्यात कोरोनाची पिछेहाट ; दुसऱ्या लाटेत प्रथमच शंभर आत बाधित.

अखेर जावली तालुक्यात कोरोनाची पिछेहाट ; दुसऱ्या लाटेत प्रथमच शंभर आत बाधित.

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कुसुंबी येथे शंभरहून अधिक लोक जमवून विवाह सोहळा आयोजित करणा-या आयोजकांवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये दंडाची कारवाई केली.यापुढेही नियम मोडणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिला आहे.

     दरम्यान प्रशासनाच्या प्रयत्नांना जावलीकरांची सकारात्मक  साथ मिळाल्याने अखेर कोरोनाची पिछेहाट होत असल्याचे सुखावह चित्र आज पहावयास मिळत आहे.कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी हाच संयम किंबहुना अजुनही काळजीपूर्वक काही दिवस सांभाळणे आवश्यक आहे.गेल्या महिनाभरात कोरोना बाधितांचे आकडे शंभरी पार वाढताना काळजी वाढवत होते.परंतू आज कोरोना बाधितांना आकडा शंभरीच्याआत आल्याने दिलासा मिळाला आहे.

          जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात आज ७३. जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज १०४ जण बरे होऊन घरी गेले आहेत.गेल्या दोन दिवसांत सुदैवाने मृत्यू ची नोंद झाली नाही.

         दि.२ व ३ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व अॅन्टीजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह रुग्ण गाव निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे .पावशेवाडी १,बहुले १ ,बिभवी ३,केळघर २, मामुर्डी २,मेढा ४,मुकवली १,रिटकवली २ , बामणोली तर्फे कुडाळ १,दापवडी २,घोटेघर १,कावडी १, कुडाळ ८,म्हसवे १, रांजणी १,शेते ३, सोमर्डी १,दिवदिववाडी १,करंदी त.मेढा १,म्हात् बु .१, मोहाट ४,एकीव १,आनेवाडी १,भिवडी ७,दरे बु. ८,दुदुस्करवाडी१ , इंदवली१ ,महिगांव १,नरफदेव १,सायगांव २, सरताळे ७,येरुणकरवाडी १.एकूण ७३

    *

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page