Thursday, February 19, 2026
HomeTop Newsआंबेघर गणात श्री कदम यांच्या प्रचाराने शिवसैनिक पुन्हा जोमात ...

आंबेघर गणात श्री कदम यांच्या प्रचाराने शिवसैनिक पुन्हा जोमात …

फोटो — आंबेघर गणात विकास कामांबाबत आ. शिंदे यांच्याशी संवाद साधताना  शिवसैनिक व कार्यकर्ते…
केळघर दि: सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना नेहमीच जावळीकरांनी समर्थ साथ दिली आहे. त्यात केळघर भाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून सेनेचे उमेदवार तथा ऋषिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक श्री आतिश कदम या युवा नेत्यांच्या प्रचाराने आंबेघर पंचायत समिती गणातील शिवसैनिक व समविचारी पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.
      कुसुंबी जिल्हा परिषद गटात निष्ठावंत व सर्वांना बरोबर घेऊन समाजकारण व राजकारण करणारे शिवसेना संपर्क प्रमुख श्री. एकनाथ ओंबळे यांची पत्नी सौ. कविता एकनाथ ओंबळे व आंबेघरची राष्ट्रवादी जावळी तालुका अध्यक्ष तथा आघाडीचे उमेदवार अतिश कदम यांनी विजयाचा सेना धनुष्यबाण हाती घेतला आहे. ठेकेदारी व भ्रष्टाचाराचा रावण नाहीसा करण्यासाठी मतदारांना चांगला पर्याय दिला आहे. अशी संपूर्ण जावळी तालुक्यात चर्चा रंगू लागलेली आहे.
     महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे व तमाम लाडक्या बहिणींचा सत्तेतील भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जावळी महाबळेश्वर चे सुपुत्र नामदार एकनाथ शिंदे, सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे,जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, एकनाथ ओंबळे यांच्या सारख्या ज्येष्ठ शिवसैनिक व मतदारांनी आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे कुसुंबी गटात शिवसेनेचे सौ. ओंबळे आणि आंबेघर गणातील सेना युवा उमेदवार आतिश कदम यांनी प्रचारात बाजी मारली आहे.
  या भागातील अस्मिता म्हणजे शहीद तुकाराम ओंबळे यांचे केंडबे गावातील स्मारक आणि बोंडरवाडी धरण व पुनर्वसन पूर्ण करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री देसाई, आ . शशिकांत शिंदे यांनी उचलली आहे. त्यांना सर्वांची साथ लाभत आहे. त्यामुळे शिवसेनेचा विजयी रथ पुढे घेऊन जाण्यासाठी या भागातील शिवसैनिक , ग्रामस्थ व विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पदाधिकारी , कार्यकर्ते राजेंद्र धनावडे, संकेत पाटील,संतोष कदम, जितेंद्र कासुर्डे, संदीप दळवी, शंकर सुर्वे, दिपक पवार, सौ. सीताबाई पार्टे, संगीता शेलार, गणेश मानकुमरे, बाबू दळवी परिश्रम घेत आहेत.

_______________________________

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page