—
???? घट उठ्ठापण विधी – पुराणोक्त पद्धत
१. पूजास्थानाची तयारी
नवरात्राच्या शेवटच्या दिवशी (महानवमी/दशमी) सकाळी पूजाघर स्वच्छ करून दिवा लावावा.
घटासमोर फुले, अक्षता, नैवेद्य ठेवावा. आपण देवघराचे देव बसवलेले आहेत त्या देवावर फुलाने पाणी शिंपडावे हळद-कुंकू अक्षदा फुले व्हावीत.घटावर फुलांची माळ लावावी.
—
२. देवीची अंतिम पूजा
घटावर गंध, कुंकू, फुले, अक्षता अर्पण करावीत.
आरती करून देवीला नमस्कार करावा.
???? मंत्र :
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते ॥
—
३. देवीला प्रार्थना – आवाहन समाप्ती
घटस्थापनेवेळी केलेलं “आवाहन” आता पूर्ण करून देवीला निरोप द्यावा.
???? मंत्र :
यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय मामकीम् ।
इष्टकामसमृद्ध्यर्थं पुनरागमनाय च ॥
???? अथवा –
गच्छ गच्छ सुरश्रेष्ठे स्वस्थानं परमेश्वरी ।
पूजामादाय मे देवि पुनरागमनाय च ॥
यानंतर गटावर लावलेल्या माळा उचलून वर अडकवाव्यात त्यानंतर जो घट कलश मांडलेला आहे तो उचलून पुन्हा जागेवर ठेवावा यावेळी आपल्या प्रथेप्रमाणेज्या देवाचे नवरात्र आहे त्या देवाचा देवीचा नाम उच्चार करावा. यावेळी बलिप्रदान केले जाते काही ठिकाणी प्रथा परंपरेनुसार पशु, नारळ, कोहळा, उडीद, घातलेला भात,फळ याचा बळी दिला जातो. शक्यतो पशुबली टाळावा. काही ठिकाणी घट उठवण्यासाठी गोंधळाची डवरपूजा केली जाते आरती केली जाते.
—
४. घटाभोवती बांधलेले सूत्र (नाडा) काढणे
घटाभोवती बांधलेले सूत्र काढून फुलांसह पाण्यात विसर्जित करावे.
—
५. कलशातील पाणी विसर्जन
कलशातील पाणी हे तीर्थ मानले जाते.
ते अंगणातील झाडांना, तुलशीला अर्पण करावे किंवा नदी/विहिरीत विसर्जित करावे.
???? मंत्र :
गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ॥
—
६. नारळ व अक्षतांचे विसर्जन
घटावर ठेवलेला नारळ देवीला अर्पण करून प्रसाद म्हणून वाटावा किंवा नदीत विसर्जित करावा.
फुले, पत्री नदीत किंवा वाहत्या पाण्यात सोडावीत.
—
७. समारोप प्रार्थना
शेवटी देवीला नमस्कार करून प्रार्थना करावी :
???? मंत्र :
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ।
त्वमेव केवलं कर्ताऽसि ।
त्वमेव केवलं धर्ताऽसि ।
त्वमेव केवलं हर्ताऽसि ।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि ॥
— यानंतर देवघरातील देवांची ताम्हणात घेऊन पंचोपचार पूजा करावी. देव्हाऱ्यात देवांना पुन्हा स्थानापन्न करण्यासाठी देवाकडे देठ करून पाने मांडावीत व त्यावर देवांना स्थानापन्न करावी नेहमीप्रमाणे पूजा आरती करावी नैवेद्य ते दाखवावा. त्यानंतर घरातील शस्त्र पूजा वाहन पूजा करावीत. घराच्या चौकटीवर मांगलिक तोरण लावावे दारात सडा रांगोळी करावी
???? महत्व
या विधीनंतर नवरात्रातील उपासना समाप्त होते.
“देवीने नऊ दिवस आपल्या घरी वास्तव्य करून आशीर्वाद दिला, आता ती आपल्या मूळ स्थानास परत जाते” अशी भावना मनात ठेवून विधी करावा.
आज नवरात्र समाप्ती : घट उठवण्याची साधी सोपी शास्त्र पद्धती
- Advertisment -