Tuesday, August 18, 2026
HomeTop Newsउपसभापती सौरभ शिंदे यांच्या माध्यमातून जावली तालुक्यात विकास कामांचा धडाका

उपसभापती सौरभ शिंदे यांच्या माध्यमातून जावली तालुक्यात विकास कामांचा धडाका

 

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली पंचायत समितीच्या पंधरावा वित्त आयोग व सेस फंडातून  उपसभापती सौरभ शिंदे यांच्या माध्यमातून विकास कामांचा धडाका सुरू आहे.

        जावली तालुक्यातील सर्जापुर  येथे १५ वित्त आयोगातुन उपसभापती मा.सौरभ राजेंद्र शिंदे यांच्या फंडातुन रस्ता कोंक्रीटीकरणचे भुमिपूजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित मान्यवर सरपंच सुजाता बोराटे ,उपसरपंच संजय मोहीते , प्रतापगड कारखाना चे माजी संचालक विश्वासराव बोराटे साहेब, ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक सदस्य देवीदास नाना बोराटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

       तसेच जावली पंचायत समिती उपसभापती मा श्री सौरभ (बाबा)शिंदे यांच्या सेस फंडातून बामणोली येथे काँक्रीटीकरण रस्ता आणि गटार बांधकाम व तसेच भिवडी येथील गटर बांधकाम विकास निधीचा भूमिपूजन शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी बामणोली व भिवडी गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

[

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page