Thursday, February 19, 2026
HomeTop Newsकडीपत्ता ठरणार जवळवाडीची नवी ओळख.-प्रा.संध्या चौगुले

कडीपत्ता ठरणार जवळवाडीची नवी ओळख.-प्रा.संध्या चौगुले

एकाच दिवसात २०० रोपांची लागवड.

 कुडाळ दि.२६ – जवळवाडी ता.जावली ग्रामपंचायतीच्या वतीने वटपौर्णिमेच्या निमित्ताने गावातील अकाली वैधत्व आलेल्या व इतर महिलांना आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावा यासाठी कढीपत्त्याच्या रोपांचे वाटप सामाजिक कार्यकर्त्या प्रा. संध्या चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना जवळवाडी ग्रामपंचायतीच्या उपक्रमांचे कौतुक करून कढीपत्त्याच्या लागवडीमुळे जवळवाडी गावाला एक नवी ओळख निर्माण व्हावी असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

                    जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ वर्षा विलास जवळ यांच्या संकल्पनेतून गेली तीन वर्ष अभिनव पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली जात असून पहिल्या वर्षी अर्ध्यावर साथ सोडून गेलेल्या पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण तर दुसऱ्या वर्षी दोनशे शेवग्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी जवळवाडीकरांनी ५०० झाडे लावण्याचा संकल्प केला असून आज वृक्षारोपण करून व रोपांचे वाटप करून याची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या प्रा.संध्या चौगुले प्रमुख म्हणून उपस्थित होत्या. या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या स्त्रीयां मुलांना जन्म देतात,त्यांचे पालन पोषण करतात आणि मुलांना घडवितात सुध्दा.त्याच मायेने आणि प्रेमाने त्या झाडे सुध्दा वाढवतील. सातारा येथिल हिरवाई आदर्शवत ठरली पण त्यासाठी खुप झटाव लागल,खुप सोसावही लागलं पण जिद्द कायम ठेवल्यास यश नक्की मिळते. आपण सगळ्या मिळूनी जवळवाडीच्या भगिनी एकत्र येवून सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहात यामुळे दिलेली झाडे तुम्ही नक्की जगवणार आहात याची मला खात्री असून यामुळे कडीपत्त्याचे गाव म्हणून आपल्या गावाला एक नवी ओळख निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सरपंच सौ वर्षा जवळ यांनी यावेळी ग्रामपंचायतीच्या उपक्रमांची माहिती देताना सांगितले अनोखी वटपौर्णिमा, संक्रात, विधायक ३१ डिसेंबर, निसर्गाशी जोडून घेणारी शिवार फेरी व रक्षाबंधन, कोरोना काळात गरीब -गरजुंना मदत, अशा विविध उपक्रमासाठी महिला,ग्रामस्थ व युवक यांची मिळत असलेली मोलाची साथ आणि जेष्ठांचे मार्गदर्शन  यामुळेच ग्रामपंचायतीचे कार्य प्रगती पथावर असून वृक्षलागवड चळवळही आम्ही यशस्वी करू.

  या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या गिता लोखंडे,मा.सदस्या शालिनी जवळ,राजश्री पाटील, आण्णासाहेब धनावडे, सुरेशबुवा जवळ,सर्जेराव जवळ,विठ्ठल पाटील,बबन जवळ,ज्ञानदेव जवळ व ग्रामस्थ,महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page