सूूूर्यकांत जोशी -आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर सह महाराष्ट्रातील अनेक श्री विठ्ठल मंदिरात भक्तीचा गजर अल्प प्रमाणात का होईना सुरू होता. अगदी पंढरपुर मधे सुध्दा मा.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित महापुजा होताना बाहेर ४०-५० लोंकाचा समुह दिसतो आहे. सायंकाळी आळंदी देवस्थानच्या ३०० लोकांनी दर्शन मिळावे यासाठी मंदिरामधेच ठिया मांडला होता.
जावळी तालुक्यातील करहर नगरी म्हणजे वारकर्यांची प्रती पंढरी.येथे मात्र शासन-प्रशासनाने पुर्ण मंदिर परिसरच सिल करून पोलिसांचा खडा पहाराच दिला.
गेल्या दोन दिवसातील नेत्यांचे कार्यक्रम, प्रशासनाच्या बैठका बघितल्या तर शेकडोंची उपस्थिती चालते तिथे कोरोना येत नाही. मात्र वारकर्यांच्या दर्शनानेच कोरोना होतो का? दरवर्षी करहर भागातून ज्या दिंड्या येतात त्या प्रत्येक दिंडीतील किमान विणेकर्याला तरी येण्यास परवानगी द्यायला हवी होती. तसे न करता आमच्या श्रध्देवरच घाला घालण्याचा सातत्याने प्रयत्न होत असेल तर विचार करावाच लागेल.
वारकरी भाविकांनो म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतो आहे. जागे व्हा आणि गावागावातील काकडा,पारायण,भजन सुरू करा.
????????????????????????????
करहर नगरीतील श्री विठ्ठल मंदिरात काय अतिरेकी येणार होते काय? हभप विलासबाबा जवळ यांचा प्रशासनावर घणाघात.
- Advertisment -
