Monday, April 6, 2026
HomeTop Newsकुडाळच्या गजराज मंडळातर्फे सोमवारी कोविड योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन

कुडाळच्या गजराज मंडळातर्फे सोमवारी कोविड योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन


सूर्यकांत जोशी कुडाळ – कुडाळ येथील गजराज मित्र मंडळाच्या वतीने सोमवारी गणेश जयंती सोहळ्या सह नियमित धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तसेच यावर्षी गणेश जयंती निमित्त होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाला बगल देऊन कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा तसेच कुडाळ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षभरात सर्वसामान्य जनतेवर आलेले कोरोनाचे विघ्न दूर करण्यासाठी विघ्नहर्ता गणेशाच्या आशिर्वादा सोबतच या महामारीच्या काळात जीवाची बाजी लावून अनेकांनी आपले योगदान दिले.या गणेशाची कृपा लाभलेल्या विघ्नहर्त्या कोरोना योद्ध्यांचा यथोचित सन्मान करणे आपले कर्तव्यच आहे आणि याच भावनेतून यावर्षी या कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्याचा निर्णय मंडळाने घेतल्याची माहिती मंडळाचे माजी अध्यक्ष महेश पवार यांनी दिली. गणेश जयंती निमित्त गजराज मित्र मंडळ यांचे वतीने कुडाळ मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसाद यांना फाटा देत गणेशभक्त व ग्रामस्थांच्या आरोग्याच्या काळजी घेऊन साधेपणाने कार्यक्रम साजरा होणार .मंडळातर्फे यावेळी दिले जाणारे
जावली भूषण अवॉर्ड पुरस्कार कोरोना काळामध्ये पहिल्या फळीत काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी , डॉक्टर्स , प्रशासकीय अधिकारी , कर्मचारी , स्वयंसेवक व आशा सेविका ,अंगणवाडी सेविका , ग्रामपंचायत सेवक यांना प्रदान करण्यात येणार आहेत.अशीही माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page