Thursday, February 19, 2026
HomeTop Newsकुडाळच्या पिंपळबनातील बालोद्यान आणि ओपन जीमचा अबालवृद्ध घेतात मनमुराद आनंद

कुडाळच्या पिंपळबनातील बालोद्यान आणि ओपन जीमचा अबालवृद्ध घेतात मनमुराद आनंद

सूर्यकांत जोशी कुडाळ – कुडाळ तालुका जावली येथील निसर्ग प्रेमी ग्रामस्थांनी संघटीत होऊन गावच्या पडिक जागेत पिंपळबन व बालोद्यान ची संकल्पना साकार केली आहे.हे नंदनवन आता आपलं पिंपळबन बन म्हणून ओळखलं जात आहे.या उपक्रमाला ग्रामस्थांबरोबरोरच तालुक्यातील अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांनी सढळ हाताने मदत केली.त्यामुळे केवळ दोन वर्षांत या उद्यानात लहान मुलांना आकर्षण असणारे झोपाळे, घसरगुंडी,सीसाॅ या सारखी खेळ साधने व ओपण जीभेची उपकरणे बसविण्यात आली आहेत.आपलं पिंपळबन आता अबालवृद्धांचे खास आकर्षण बनले आहे. दररोज सकाळी व सायंकाळी येथे खेळण्यासाठी बालचमुची तसेच व्यायामासाठी युवा व वृद्धांची गर्दी होत आहे.

पिंपळबनच्या दुसऱ्या टप्प्यातील वाॅकिंग ट्रॅक,लाॅन व कारंजा इत्यादी सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.इच्छुक राज्यांनी वस्तू व रोख स्वरुपात आपली मदत देऊन सहकार्य करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page