Thursday, February 19, 2026
HomeTop Newsकुडाळ गटात फक्त कमळच फुलणार : जयश्री गिरी सौरभ शिंदे यांच्या प्रचाराचा...

कुडाळ गटात फक्त कमळच फुलणार : जयश्री गिरी सौरभ शिंदे यांच्या प्रचाराचा झंजावात


कुडाळ – गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कुडाळ गटासह संपूर्ण तालुक्यात ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून  मोठ्या प्रमाणात विकास कामांचा डोंगर उभा राहिला आहे. जावळीतील जनतेने यांनी स्वप्नातही पाहिला नसेल असा महामार्ग पाचवड पासून चिपळूण ला जोडला जात आहे त्याचबरोबर महाबळेश्वर पाचगणीचे पर्यटक करहर कुडाळ मार्गे महामार्गाला यावेत यासाठी पाचगणी ते पाचवड हा सुद्धा रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे अशा प्रकारची कोट्यावधी रुपयांची कामे होत आहेत. याचा लाभ जावली तालुक्यातील जनतेला  होणार असून येथील उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे. त्यामुळे मतदार भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठाम उभे आहेत. कुडाळ गटातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार जयश्री गिरी व सौरभ शिंदे यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा लागत आहे.


            भारतीय जनता पक्षाच्या कुडाळ गटाचे उमेदवार जयश्री गिरी यांचे सर्वसामान्य जनतेचे संबंध आहेत. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात तळमळीने सहभागी होतात. जयश्री गिरी व सुहास गिरी यांनी यापूर्वी पंचायत समितीचे सभापती भूषवले असून या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामांच्या बरोबरच तालुक्यातील जनतेशी चांगले ऋणानुबंध जोडले आहेत. या दाम्पत्याच्या बाबतीत जनतेच्या मनात प्रेम सहानुभूती व विश्वास आहे त्यामुळे जनतेशी त्यांची चांगली नाळ जोडली गेलेली आहे.याचा फायदा या निवडणुकीत त्यांना होताना दिसून येत आहे जयश्री गिरी या मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास मतदारांमधून व्यक्त होत आहे.

प्रत्येक वाडीवर वस्तीवर जाऊन सौरभ शिंदे व सुहास गिरी यांनी जनतेशी संवाद साधला


            सौरभ शिंदे यांना सुद्धा कुडाळ गणात मतदारांनी पसंती दिली असून प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांना मोठा दिलासा मिळालेला आहे. माजी आमदार वार्षिकराव शिंदे तसेच कारखान्याचे दिवंगत चेअरमन राजेंद्र शिंदे यांच्या माध्यमातून जोडले गेलेले कार्यकर्ते आजही तेवढ्याच विश्वासाने व ताकतीने सौरभ शिंदे यांच्या पाठीशी आहेत.गेल्या दहा वर्षात सौरभ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात संघटन केले आहे जुन्या जाणत्या कार्यकर्त्यां बरोबरच युवकांचे फळी त्यांच्या पाठीशी असताना दिसते नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ शिंदे यांचे नेतृत्व वेगाने पुढे येत असून कुडाळ सारख्या मोठ्या गावातून सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाला या पुढील काळातही राजकारणात चांगली संधी असल्याचे दिसून येते. कुडाळगणाच्या सर्वांगीण विकासासाठी सौरभ शिंदे यांचे नेतृत्व योग्य असल्याचे मत मतदारांमधून व्यक्त होत आहे व त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे त्यामुळे सौरभ शिंदे यांचा विजय मोठया मताधिक्याने होईल ठाम विश्वास मतदारांमधून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page