कुडाळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा कुंभार तर उपसरपंचपदी सोमनाथ कदम यांची बिनविरोध निवड
कुडाळ – कुडाळग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्रिशंकू निकाल लागल्याने या ग्रामपंचायतीची सरपंच निवडणूक जावली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधी ठरली होती. अखेर पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील रयत पँनल व माजी उपसरपंच गणपत कुंभार, हेमंत शिंदे ,संजय शिंदे, आशिष रासकर यांच्या मित्र परिवाराच्या बहुजन विकास आघाडीची युती होऊन सरपंच पदी रयत पँनलच्या सुरेखा निव्रत्ती कुंभार यांची तर उप सरपंच पदी बहुजन विकास आघाडी च्या सोमनाथ लक्ष्मण कदम यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी प्रकाश गाढवे यांनी काम पाहिले.
आज सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची विषेश बैठक बोलावण्यात आली होती. या सभेला माजी सरपंच वीरेंद्र शिंदे व अन्य दोन सदस्य या बैठकीला अनुपस्थित राहिले. तर या पँनल मधून निवडून आलेल्या राहुल ननावरे या वेळी उपस्थित होते।
सौरभ शिंदे म्हणाले, कुडाळच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. ग्रामपंचायतीची च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कोणत्याही योग्य कामासाठी अडवणु केली जाणार नाही.सर्वांना समान संधी मिळावी यासाठी एकत्रित काम केले जाईल. निवडणूक संपली असल्याने कोणताही राजकीय व गटातटाचा अभिनिवेश न ठेवता काम नवीन कार्यकारिणीने करावे.
प्रकाश रासकर स्वागत व अभिनंदन केले.यावेळी जावली शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे, माजी सरपंच जितेंद्र शिंदे,शिवाजीराव शेवते,गणपत कुंभार,संजय शिंदे,हेमंत शिंदे,धनंजय केंजळे, विलासराव कांबळे ,दत्तात्रय रासकर ,उपस्थित होते.फटाक्यांच्या आतशबाजीत व जेसीबीच्या सहाय्याने गुलाल उधळण करत नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच,सदस्य व पँनलप्रमुखांचे स्वागत करण्यात आले.