परिचारिका या आरोग्य सेवेचा महत्वपूर्ण कणा – सोमनाथ कदम
सूर्यकांत जोशी कुडाळ – रुग्णांना केवळ औषधे बरी करु शकत नाहीत.तर रुग्णांच्या मनात आपुलकीने आत्मविश्वास निर्माण करुन त्यांना जगण्याची प्रेरणादेण्याचे काम परिचारिका करत असतात . परिचारिका या आरोग्य सेवेचा महत्वपूर्ण कणा आहे.असे प्रतिपादन कुडाळ चे उपसरपंच सोमनाथ कदम यांनी केले.
दरम्यान आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांचा कुडाळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत वेलणकर, डॉ.स्वामिनी चव्हाणके, सुरेश भिसे, महेश पवार, आशिष रासकर, अतुल बावकर,गौरव शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.
