
सूर्यकांत जोशी कुडाळ – युवकांच्या संकल्पनेतून कुडाळ येथे साकारलेला पिंपळबन व बालोद्यान प्रकल्प कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी केले.
सातारा जिल्हयाचे अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी आज कुडाळ येथील लोकप्रिय व बहुचर्चित पिंपळबनला सदिच्छा भेट दिली.यावेळी मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि निळकंठ राठोड, कुडाळ पोलिस दूरक्षेत्राचे पीएसआय संतोष चामे,सहा.पोलिस उपनिरीक्षक सूर्यकांत शिंदे,हवालदार इम्रान मेटकरी,संभाजी बाबर ,जेष्ठ नागरीक व पिंपळबनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक पाटील यांच्या हस्ते पिंपळबनात वृक्षारोपण करण्यात आले.समाजाभिमुख असणाऱ्या या प्रकल्पाला पाटील यांनी 20 पिंपळाचे झाडे भेट देत असल्याचे जाहीर केले.आणि एका तासात त्यांनी पिंपळाची २५ रोपे पिंपळबन उद्यानत पोहच करुन पिंपळबन कार्यकर्त्यांना सुखद धक्का दिला.