
कुडाळ : प्रतिनिधी
महाराजा शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुडाळ (ता. जावली, जि. सातारा) या विद्यालयाने एन.एम.एम.एस. (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेत उज्वल यश संपादन करत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
शैक्षणिक वर्ष 2025–2026 साठी घेण्यात आलेल्या या परीक्षेला विद्यालयातील एकूण 48 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे 14 विद्यार्थ्यांनी 100 पेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये राजवीर सागर शिंदे (142 गुण) याने प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर वैष्णवी निलेश वारागडे (130 गुण) हिने द्वितीय, वरद संतोष शिंदे (119 गुण) याने तृतीय, श्रावणी राजेंद्र मोरे (116 गुण) हिने चतुर्थ तर आराध्या संतोष जाधव (112 गुण) हिने पाचवा क्रमांक पटकावला.
या यशासाठी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सौ. वर्षा राजेश पाटील, तसेच श्रीमती जयश्री पांडुरंग सूर्यवंशी, सौ. अश्विनी विलास किर्वे आणि सौ. शुभांगी नामदेव मोरे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती, शाळा सल्लागार समिती, माता-पालक समिती, सरपंच व सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच मुख्याध्यापिका यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

