Monday, April 6, 2026
HomeTop Newsकेडंबे येथील आरोग्य उपकेंद्राच्या अडचणी लवकरच दूर होतील - आ. शिवेंद्रसिंहराजें.

केडंबे येथील आरोग्य उपकेंद्राच्या अडचणी लवकरच दूर होतील – आ. शिवेंद्रसिंहराजें.

केडंबे आरोग्य उपकेंद्राला आ.शिवेंद्रसिंहराजेंच्या भेटी प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ

केळघर, ता :२४:केडंबे ता :जावळी येथे ग्रामस्थांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून आरोग्य उपकेंद्राची चांगली इमारत उभी केली असून आरोग्य उपकेंद्रासाठी पुरेशी औषधे, बेड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच येथील उपकेंद्रातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
आज केडंबे येथील आरोग्य उपकेंद्राला आमदार भोसले यांनी भेट दिली त्यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी समुदाय अधिकारी सुप्रिया मुळे,बंडोपंत ओंबळे, चंद्रकांत ओंबळे,महादेव ओंबळे, आनंदा ओंबळे, वसंतराव चिंचकर, विकास ओंबळे, संपत ओंबळे, बंडू ओंबळे, विशाल ओंबळे, सागर ओंबळे, शिवाजी ओंबळे, किरण ओंबळे, बळवंत पाडळे यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार भोसले यावेळी बोलताना म्हणाले, जावळी तालुक्यात विविध विकास कामे नागरिकांच्या मागणीनुसार केली आहेत. प्रलंबित कामेही उर्वरित काळात पूर्ण करू. सध्या जावळी तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढला असून हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी आरोग्य विभागास सहकार्य करावे. जावळी तालुक्यात आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करत असून तालुक्याने माझ्यावर प्रेम केले असून तालुका जिल्ह्यात आदर्श करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली.यावेळी आमदार भोसले यांनी आरोग्य उपकेंद्राची पाहणी करून ग्रामस्थांशी साधला. डॉ. मुळे यांनी स्वागत केले. विकास ओंबळे यांनी आभार मानले.
केडंबे(ता. जावळी):आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची पाहणी करताना शिवेंद्रसिंहराजे भोसले. त्यावेळी विकास ओंबळे, सुप्रिया मुळे, बंडोपंत ओंबळे आदी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page