कुडाळ – मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि निळकंठ राठोड यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्या नंतर मेढा पोलीस ठाण्याचा पुन्हा पदभार स्विकारला.यावेळी मेढा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले . तसेच जावली पंचायत समितीच्या सभापती हभप सौ.जयश्री गिरी यांनीही त्यांचे शाल व श्रीफळ भेट देऊन स्वागत केले.
सपोनि राठोड यांनी जावली तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखत असतानाच आपल्या सहकार्यांच्या तसेच सर्वसामान्य जनतेच्या मनात आपुलकीचे नाते निर्माण केले होते.यांनी गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळत असतानाच सर्वसामान्य जनतेला आधार दिला असल्याचे प्रतिपादन जावली पंचायत समितीच्या सभापती जयश्री गिरी यांनी केले.
गेले सहा महिने कोरोना मुळे निर्माण परिस्थितीत प्रशासनाच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सपोनि राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व सहकार्यानी अहोरात्र मेहनत घेतली. यामध्ये राठोड साहेब तसेच अनेक पोलिस कर्मचारीही कोरोना बाधित झाले होते. परंतु सर्वानी यशस्वी पणे कोरोनावर मात केली असल्याचे गिरी म्हणाल्या