Thursday, February 19, 2026
HomeTop Newsगावच्या विकासासाठी दोन्ही राजकीय गटांचा जोरदार प्रयत्न होत असल्याचे पाहून कुडाळकर सुखावले

गावच्या विकासासाठी दोन्ही राजकीय गटांचा जोरदार प्रयत्न होत असल्याचे पाहून कुडाळकर सुखावले

सूर्यकांत जोशी कुडाळ : गेल्या काही वर्षात कुडाळ गावच्या विकासाला काहीसा ब्रेक लागला होता.अनेक कामे मंजूर होती परंतु राजकारणाच्या फेऱ्यात ही कामे अडकल्यामुळे होत नव्हती. आता कुडाळ गावच्या पूर्व वेशी पासून विकासाला सुरुवात होत असून यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून ही कामे होण्यासाठी आपणच प्रयत्न केला असल्याचे नेतेमंडळी सांगत असल्याने गावच्या विकासासाठी गावातील ना. बाबाराजेंच्या नेतृत्वाखालील राजकीय गट ताकदीने प्रयत्न करत असल्याचे पाहून कुडाळकर मात्र सुखावले आहेत. गावच्या विकासासाठी अशाच पद्धतीने सर्वांनी ताकतीने प्रयत्न करावेत गावातील रस्ते खड्डे मुक्त व्हावेत बंदिस्त गटारे व्हावीत यासह असणारे विविध प्रश्न प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून तर कधी राजकीय श्रेयाची चढाओढ करत मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून नेते मंडळींनी कामे मार्गी लावावीत तसेच ही कामे दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा कुडाळ ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

दोन्ही गटाकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आलेले पत्रके पुढीलप्रमाणे *

कुडाळतील गावातील मुख्य रस्ता असलेला इंदिरानगर , लक्ष्मी रोड बाजारपेठ मार्गे छ.संभाजी महाराज चौक रस्त्याचे काम अखेर मार्गी : विरेंद्र शिंदे*1

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून PWD (S.R.फंड) मधुन सातारा जिल्हा दिशा समिती सदस्य मा. सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विरेंद्र शिंदे यांच्या मागणीनुसार कुडाळ येथील पाचवड हून कुडाळ गावात येणारा इंदिरानगर , बाजारपेठ ते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौक हा रस्ता मंजूर करण्यात आला होता.परंतु त्या कामास काही तांत्रिक अडीअडचणी मुळे विलंब लागत होता. या रस्त्यावर महाराज शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज असल्यामुळे शाळेत जाता येता विद्यार्थ्यांची पावसाळ्यामध्ये खूप गैरसोय होत होती मुलांच्या अंगावर चिखल व पाणी उडत होते आता या ठिकाणी दोन्ही बाजूस आरसीसी गटर व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी फूटपाथ याची सोय होणार आहे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या रस्त्याला असल्यामुळे या रस्त्याला खूप रहदारी आहे या रस्त्याच्या बाजूलाच पशुवैद्यकीय दवाखाना असल्यामुळे हा रस्ता गावातील व भागातील नागरिकांन साठी महत्त्वाचा आहे ही गोष्ट सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कानावर घातली आणि महाराज साहेबांनी लगेच अधिकारी यांना आदेश दील्याने तात्काळ ह्या कामाची सुरुवात करण्यात येणार आहे. या रस्त्या सह आरसीसी गटाचे काम चालू होत असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले व माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे विशेष आभार मानलेया रस्त्याचे काम सुरू करताना कुडाळ गावचे उपसरपंच सोमनाथ कदम, ग्रामपंचायत सदस्य राहुल ननावरे, युवा नेते आशिष रासकर, बांधकाम व्यवसायिक समीर भाई आत्ताDMK बँकेचे संचालक चंद्रकांत गवळी पिंपळवण अध्यक्ष महेश पवार समीर डांगे यशवंत कुंभार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी साहेब इत्यादीस ग्रामस्थ उपस्थित होते.

कुडाळच्या रस्त्याच्या कामासाठी सौरभ शिंदे बाबा यांचा पाठपुरावा :सरपंच सुरेखा कुंभार

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले हे मंत्री झाल्यापासून संपुर्ण तालुक्याचा गतिमान विकास सूरू असून जावली तालुक्यातील सर्वात मोठी लेकसंख्या असलेल्या कुडाळ गावातही कोट्यावधी रूपयांची विकासकामे सूरू झालेली आहेत, कुडाळ गावातील अंतर्गत मुख्य रस्ता संभाजी महाराज चौक – बाजारपेठ – हायस्कूल रस्ता- इंदीरानगर चौक हा रस्ता देखील खूप खराब झाल्याने आमचे नेते व प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सैारभबाबा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ ग्रामपंचायतीच्या वतीने नामदार शिवेंद्रराजे भोसले यांना सदरच्या रस्त्याच्या कामाबाबात पत्रव्यवहार करून निधीची मागणी करम्यात आली होती, सदरच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने जावक क्रमांक. मुअ,पुणे,नियो.धा.23.04.04/4788/2023 या संदर्भीय पत्रानुसार 2023 सालामध्येच मंजूरी देण्यात आलेली होती, त्यामुळे मात्र काही तांत्रिक अडचणी व निधी अभावी सदरच्या रस्त्याचे काम थांबले होते, त्यानंतर नामदार बाबाराजेंच्याकडे बांधकाम खात्याचे मंत्रीपद आल्यानंतर तात्काळ या कामांना निधी उपलब्ध झाला असल्याने या रस्तायाच्या कामाला आता सुरूवात होत आहे, मात्र आज ज्यांचा या कामाशी दूरपर्यंत कसलाही संबंध नाही त्यांनी सदरचे कामाबद्दल फोटोसेशन करून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र अशा दिशाभूलीला सुज्ञ जनता भुलणार नसल्याचे मत कुडाळच्या सरपंच सैा.सुरेखा कुंभार यांनी प्रसि्धदीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

ये पब्लिक है…ये सब जानती है- धैर्यशिल शिंदे

आमचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून व मा.सैारभबाबा शिंदे यांच्या सहकार्याने कुडाळ ग्रामपंचायतीने पाठपुरावा केलेल्या कुडाळ येथील रस्ताच्या कामाला सुरूवात होत असल्याने नामदार भोसले यांचे कुडाळ ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनंदन करतो, मात्र सदरचे काम मुळात 2023 सालीच मंजूर झालेले आहे, सदरच्या मंजूरीचे पत्रदेखील ग्रामपंचायतीकडे आहे, याकामासाठी वास्तविक सौरभ बाबा शिंदे , मालोजीराव आण्णा शिंदे , राजेंद्रजी शिंदे , जितेंद्रदादा शिंदे, यांच्यासह सरपंच व सर्व सदस्य यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता, त्याला आज यश आले आहे, मात्र ज्या लोकांनी आदरणीय बाबाराजेंच्या विधानसभा निवडणुकीत विरोधी भुमिका बजावली ती मंडळी बाबाराजेंनी मंजुर करून दिलेल्या कामावर फोटो सेशन करतायत व माप पट्टी घेऊन ऊभे राहतायत. ज्यांनी बाजारपेठेत उभे राहुन एकेरी उल्लेख केले ती आज फोटो काढतायत व कामात आमचा वाटा असल्याचा केविलवाणा आव आणतायत. मात्र ये पब्लिक है…ये सब जानती है… त्यामुळे अशा दिशाभुलीला सुज्ञ जनता कधीही थारा देणार नाही, हे काम मंजुर होऊन एक वर्ष हुन ही अधिक काळ गेलेला आहे. परंतु तांत्रिक अडचणी व पैसे ची उपलब्धता नसल्याने कामाला थोडी दिरंगाई झाली . महाराज साहेबांनी पैसे उपलब्ध करून दिल्याने आता कामाला प्रत्यक्षात सुरवात होत आहे. त्याबद्दल महाराज साहेबांचे मनःपूर्वक आभार. ज्यांचा काहीही संबंध नाही ती कितीही नाचली आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग होणार नाही. आणि विधानसभेला बाबाराजेंच्या विरोधात मते मागणार्यांना बरोबर घेऊन विकास कामांवर मिरवणार्यांनी आत्मपरीक्षण करावे. आज कुडाळ व पंचक्रोशी चे सर्व रस्त्यांची कामे महाराज साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पथावर आहेत. व आमचे नेते यांच्या कामावर यायची व आमच्या नेत्यांनी केलेला विकास काम मान्य करायची नामुष्की ह्या अशा लोकांवर येत आहे हे ही समाधानकारक बाब आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page