
कुडाळ – गेल्या वीस वर्षात सर्वसामान्य जनतेशी जवळीक ठेवणाऱ्या गिरी दांपत्याबाबत जनतेच्या मनात अत्यंत आपुलकी व प्रेम आहे त्यामुळे या निवडणुकीत कुडाळ गटाच्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई गिरी यांना सायगाव गणातून विक्रमी मताधिक्य देणार असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य मच्छिंद्र क्षीरसागर यांनी केले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयश्री गिरी ताई यांनी सायगाव विभागातील प्रत्येक गावात भेट देऊन मतदारांशी संपर्क साधला यावेळी प्रत्येक गावातून त्यांना मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शासनाच्या लाडकी बहिण योजनेमुळे महिला वर्गात भारतीय जनता पक्षाविषयी प्रचंड प्रेम व विश्वास आहे असे महिलांकडून सांगितले जात आहे. या गटात येणारी डोंगरापलेकडील 11 गावे ही 100% जयश्री गिरी यांना मते मतदान करणारे आहेत असे ठाम मत यावेळी उपस्थितानी व्यक्त केले.
निवडणूक जाहीर झाल्यापासून जयश्रीताई गिरी व सुहास दादागिरी आहे पायाला भिंगरी बांधून सर्वसामान्य जनतेच्या पर्यंत पोहोचत आहेत नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विचार आणि त्यांच्या माध्यमातून मतदार संघात होत असलेली विकास कामे लोकांना आवर्जून सांगत आहेत येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या ग्रामीण भागात आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मिळवून देण्याचे काम बाबाराजेंच्या माध्यमातून होणार आहेत त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था एकाच विचाराच्या असणे गरजेचे आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठाम आहे त्यामुळे जयश्रीताई गिरी विक्रमी मताने निवडून येतील असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.