गरवारे ब्रेस्ट मधील कुडाळ ग्रुपच्या वतीने एकवीस हजारांची देणगी

पिंपळबनात वृक्षारोपण करताना गरवारे ब्रेस्ट कुडाळ ग्रुप
कुडाळ दि.६ -. कुडाळ ता.जावली येथील पिंपळ बनात जागतिक पर्यावरण दिन नव्हे तर पर्यावरण मास उपक्रम दि. १ जुलै पर्यंत राबवण्यात येत आहे.आज यानिमित्ताने वाई येथील गरवारे ब्रेस्ट प्रा.लि. या कंपनीत कार्यरत असलेल्या कुडाळ येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी त्यांनी आपल्या कुडाळ ग्रुपच्या वतीने पिंपळबन उद्यानातील ओपनजिम साहित्य व विविध वृक्षांच्या संगोपनासाठी एकवीस हजार रुपयांचा निधी पिंपळबन समितीकडे सुपूर्द केला. यावेळी कै. श्री.हणमंतराव शेवते यांच्या स्मरणार्थ श्री .सागर हणमंतराव शेवते व श्री राहुल हणमंतराव शेवते यांच्याकडून पिंपळबन साठी दहा हजार एक रुपयांची देण्यात आली.
कुडाळ येथील उजाड माळरानावर लोकसहभागातून साकारत असलेल्या आपलं पिंपळबनने चांगलंच बाळसं धरलं आहे.पिंपळबनातील वृक्षवल्ली आता डौलाने डोलू लागल्या आहेत. हे नंदनवन आता सर्वांनाच भुरळ पाडत आहे.आज पर्यंत झालेलं काम आणि भविष्यातील योजना समजल्या नंतर या उपक्रमाला मदत करण्यासाठी हजारों हात पुढे येत आहेत.लोकानी या उपक्रमाला दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळेच हे शक्य होत असल्याचे पिंपळबनचे अध्यक्ष महेश पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कुडाळ गावातील गरवारे बेस्ट्रेच प्रा. लि. या कंपनीमध्ये कार्यरत असणारे प्रवीण बावकर,संजय भोसले,. वैभव वारागडे , राहुल हणमंतराव शेवते , महेश कुंभार राजे ,अमोल लोखंडे तसेच कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम, सदस्य राहुल ननावरे , गौरव शिंदे, आशिष रासकर व पिंपळबनचे सदस्य उपस्थित होते.
