एकूण – बाधित ५३३८, डिस्चार्ज ४२४८, मृत्यू १२४, अॅक्टिव्ह ९६६
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज कोरोना बाधितांना आकड्यांचे पुन्हा शंभरी पार केली. दि.२८ रोजी घेतलेल्या सर्वांचे अहवाल गुरुवार दि.२९ रोजी रात्री प्राप्त झाले यामध्ये १३० जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.मात्र त्याच वेळी २५४ जण कोरोनावर मात करुन सुखरूप घरी गेले आहेत.हे दिलासा देणारे आहे.एप्रिल महिन्यातील आणखी दोन मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण कोरोना मृत्यू चा आकडा १२४ झाला आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२८ रोजी घेतलेल्या स्वाबचे गुरुवार दि.२९ रोजी आलेल्या कोरोना बाधितांची गाव निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे.
मान्टी १,तेटली १,बिभवी ८,बोंडारवाडी २,गवडी २, जवळवाडी १७,करंजे ५,केडंबे १,केळघर १, मामुर्डी १,मेंढा १४,ओझरे ६,रिटकवली ३,वाटंबे १,आखाडे १, बामणोली तर्फे कुडाळ ७,हातगेघर ३,हुमगांव १, खर्शीबारामुरे २, कुडाळ ४,पानस१,दिवदिवाडी ३,दुंद १,कुसुंबी २,म्हाते बु.४, म्हाते खु.८,मोहाट २,पाटणेमाची २,कुसुंबी १ मृत्यू १७/४/२१,आनेवाडी ३,आर्डे ३,भिवंडी ४,खर्शी त.कुडाळ १,महिगांव १,सायगांव ३, सर्जापूर ३,सरताळे १, एकूण १३०.