एकूण – ९३४ , बळी २२, डिस्चार्ज ६२७ ,अँक्टिव्ह २७६
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात रविवारी आपटी येथील ग्रामसेवक तसेच सोमर्डी ग्रामीण रुग्णालयातील शिपाई यांच्यासहखाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्जापूर येथील एक व्यक्ती कोरोना बाधित आला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.आज सर्जापूर या गावाचा कोरोना बाधिंतांच्या यादीत आज नव्याने समावेश झाला आहे.
दरम्यान तालुक्यातील कोरोना बाधितांच्या हायरिस्क काँन्टँक्ट मधील ९० लोकांच्या स्वाबचे अहवाल पुणे येथील लँबला पाठवण्यात आले आहेत .परंतु सदर अहवाल रात्री दहा वाजे पर्यंत प्राप्त झाले नाहीत. दरम्यान खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्जापूर येथील एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे समजते.त्यामुळे सर्जापूर या गावाचा कोरोना बाधिंतांच्या यादीत आज नव्याने समावेश झाला आहे.
जावली तालुक्यातील २ गावात रविवारी कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील सायगांव येथील बौद्ध आळी,मेढा प्रभाग २ या दोन गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील २ गावाला कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी निर्धारित नियमानुसार कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.
सर्वांनी स्वतः ची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. नियमांचे पालन करावे, मास्क व सोशलडिस्टेन्सींग ठेवावे असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.
संपूर्ण जग कोरोनाचा मुकाबला करत आहे. कोरोना बाधितांचा उपचारा शिवाय मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना पुढे येत आहे. अनेकाना रुग्णालयात बेड मिळत नाही. कोरोना बाधितांची होणारी वाताहत प्रसिद्धी माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत आहे. तर हा संसर्ग वाढण्याचे मूळ लोक नियम पाळत नाहीत हेच असल्याचे सांगण्यात येत आहे. शासन, प्रशासन, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते ,प्रसिद्धी माध्यमे लोकांना नियम पाळण्याचे व सावध राहण्याचे गेले पाच महिने आवाहन करत आहेत. परंतु नियम न पाळणार्या काही लोकांमुळे संपूर्ण व्यवस्थाच कोलमडत आहे. अजूनही वेळ गेली नाही. आतातरी सावध व्हा असेच आवाहन जनतेला विविध माध्यमातून करण्यात येत आहे.
जावली तालुक्यात मंगळवार पासून सात दिवस कडक जनता कर्फ्यु
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी निर्णय
जावली तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून अनेक गावात कोरोना रुग्ण सापडत आहेत तालुक्याच ठिकाण असलेल्या मेढा नगरीतही कोरोनाने दीड शतक पार केले आहे तालुक्यातील ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंगळवार दि ८ सप्टेंबर ते सोमवार दि १४ सप्टेंबर पर्यंत पूर्ण तालुक्यात कडक जनता कर्फ्यु पाळण्याचा लोकांनी लोकांसाठी निर्णय घेतला आहे कोरोनाची दाहकता वाढली असून बेड मिळत नाहीत म्हणून नागरिकांनी आणि व्यापाऱयांनी सहकार्य करून कडक बंद पाळावा असे आवाहन करण्यात आले आहे
तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते, व्यापारी,पदाधिकारी, सरपंच व अधिकारी,पत्रकार यांच्या आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.