२११६, डिस्चार्ज १८९२, बळी ६२,अँक्टिव्ह १६२
सूर्यकांत जोशी कुडाळ – शनिवारी रात्री आलेल्या अहवालात जावली तालुक्यातील १२ जण कोरोना पाँझिटीव्ह आहेत. यामध्ये म्हाते बु.६, कुसुंबी १,खर्शी बारामुरे १, बेलावडे १, गांजे १, मेढा १, आगलावेवाडी १ यांचा समावेश आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
दसर्याच्या दिवशीही देवाचे दर्शन न झाल्याने भाविकांत नाराजी.
गेले नऊ दिवस मनोभावे नवरात्र उपवास केलेल्या भक्तांना दसर्याच्या दिवशी आपल्या आराध्याचे दर्शन व्हावे अशी अपेक्षा होती. परंतु शासनाच्या आदेशानुसार मंदिरे भाविकांसाठी बंदच राहीली.त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी होती तरीसुद्धा अनेक भाविकांनी श्रद्धेने मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन देवाला आपला नमस्कार पोहचवला.
राजकीय कार्यक्रमांना गर्दी चालते तिथे कोरोनाचा संसर्ग होत नाही. परंतू देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेल्यास कोरोनाचा संसर्ग वाढेल या शासनाच्या भूमिकेबाबत लोकांमधून आश्चर्य होत आहे. योग्य खबरदारी घेऊन देवाच्या दर्शनासाठी मंदिरे खुली करण्यात यावी अशी मागणी आता भाविकां मधून होत आहे.
