Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावलीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७६१ अर्ज दाखल; ३० ग्रामपंचायती बिनविरोध ; ८२ जागा...

जावलीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७६१ अर्ज दाखल; ३० ग्रामपंचायती बिनविरोध ; ८२ जागा रिक्त

दुदुस्करवाडीत एकही अर्ज दाखल नाही ;

सूर्यकांत जोशी कुडाळ –  जावली तालुक्यात ७५ ग्रामपंचायतीच्या ५४५ जागांसाठी निवडणुका होत आहेत.यासाठी आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी पर्यंत एकूण ७६१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ३० ग्रामपंचायतींचा निवडणूक बिनविरोध  झाल्याचे स्पष्ट होत आहे. या शिवाय अन्य काही गावे बिनविरोध करण्याकडेच कल दिसत आहे. काही ग्रामपंचायतीच्या साठी सदस्य संख्ये पेक्षा जास्ती अर्ज दाखल झाले असले तरीही गाव पातळीवर निर्णय घेऊन निवडणूक बिनविरोध केली जाईल असेच अनेक गावांचे प्रतिनिधी बोलत होते.राखीव जागांसाठी उमेदवार न मिळाल्याने तसेच गावपातळीवर अडचणी मुळे तब्बल ८२  जागा रिक्त राहिल्या आहेत. दुदुस्करवाडी ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. तर रांजणी ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याची माहिती जावली तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त प्रसिद्धी पत्रकातून प्राप्त होत आहे.

          ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने मेढा तहसीलदार कार्यालय परिसरात लोकांनी आज  तूफान गर्दी केली होती.जावली तालुक्यातील सर्वात मोठ्या कुडाळ ग्रामपंचायतीच्या पंधरा जागांसाठी आज अखेर तब्बल  ५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 

            तालुक्यातील ७५ ग्रामपंचायती पैकी सात जागांसाठी निवडणूक होत असलेल्या गावांची नावे व दाखल अर्ज पुढील प्रमाणे – धनकवडी ५ , निझरे  १० , मालचौंडी। ८ ,पिंपरी त. मेढा। ७ ,करंडी त.मेढा ६  ,काळोशी ८ , करंजे ७  ,केंजळ  ५ ,केसकरवाडी १२   ,मोरावळे  १४  ,केडंबे  ७ ,बोंडारवाडी ५  ,भूतेघर ५    ,डांगरेघर ६  ,पुनवडी ८  ,मोहाट ७  ,म्हाते खु. ६  , म्हाते बु . ७ ,मुकवली ८, रेंगडेवाडी ६ ,वरोशी ७  ,गवडी  ७, चोरांबे ५  ,दिवदेव  ६, मामुर्डी १३  ,भालेघर ११ , सनपाने १२,आखेगणी  ५ ,आंबेघर त.कुडाळ ६ हातगेघर  १३  , पिंपळी ८  ,महु १५ , रांजणी १ , वहांगाव १०  ,काटवली  ४,दापवडी  ४,बेलोशी ६  ,आलेवाडी ८ , करंदोशी  १० , दरे बु.  १० , महामुलकरवाडी  २६  ,रायगांव २१ , नरफदेव  १० , दरे खु.९   ,महिगाव  १०  , दुदुस्करवाडी  ० , पवारवाडी २०  ,आर्डे  १६ , बेलावडे १४  ,मरडमुरे ६   , धोंडेवाडी ९   ,आपटी  ७ ,निपाणी  ८  ,कसबे बामणोली  ५ ,कारगांव  ८ , वेळे  ९ ,मुनावळे ५  ,शेवडी १४   ,उंबरेवाडी १४   ,अंधारी कास १४  ,इंदवली त.कुडाळ ७   , करंदी त. कुडाळ १०   ,रानगेघर १०    , भिवडी १४  ,जरेवाडी ९  ,कोलेवाडी  ६, शेते ६ , सर्जापूर १३ .

    ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी निवडणूक होत असणारी  गावे व दाखल अर्ज – आंबेघर त.मेढा ९  ,खर्शी त. कुडाळ १८   ,सायगांव  १३ ,बामणोली त. कुडाळ  १८- ,हुमगांव  १३ , सरताळे  २२ .अर्ज दाखल झाले आहेत.

         दि.३१ पासून   उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज माघार घेण्याची मुदत दि. ४ जानेवारी पर्यंत असून  दि.१५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.दि १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. जावलीचे तहसीलदार तथा अध्यासी अधिकारी राजेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page