Saturday, April 11, 2026
HomeTop Newsजावलीत चौघांची कोरोनावर मात.जनतेला संकटाचे गांभीर्य नाहीच

जावलीत चौघांची कोरोनावर मात.जनतेला संकटाचे गांभीर्य नाहीच

जावलीत चौघांची कोरोनावर मात.जनतेला संकटाचे गांभीर्य नाहीच

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला, म्हाते येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष.अशा चौघांनी आज कोरोनावर मात केली.  तालुक्यात एकूण कोरोना बाधित १३१, बळी ९, डिस्चार्ज ७४,अँक्टिव्ह ४८ अशी गुरुवार अखेर पर्यंत ची आकडेवारी आहे.

रविवारी रात्री उशिरापर्यंत अहवाल आले नाहीत. 

       विविध माध्यमातून अनेक क्षेत्रातील मान्यवर जनतेला वेळोवेळी गर्दी न करण्याचे, मास्क व सोशल डिस्टेन्सींग पाळण्याचे आवाहन करत आहेत. परंतु जनतेला मात्र अजुनही या संकटाचे गांभीर्य कळलेले नाही.बाजारपेठांतील गर्दी कोरोनाच्या संकटाला आमंत्रण देत आहे.

           दरम्यान शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना अहवात जावली तालुक्यातील तीन जणांचा अहवाल पाँसिटीव्ह आला आहे. सुदैवाने मेढा ग्रामीण रुग्णालयातील परिचारीकेच्या संपर्कातील अहवाल निगेटिव्ह आल्याने मेढा व परिसरातील जनतेला दिलासा मिळाला आहे.

               शनिवारी रात्री उशीरा आलेल्या अहवालात बिरामणेवाडी येथील पूर्वीच्या रुग्णाची पत्नी वय ४५ वर्षे  व मुलगी  १६ वर्षे तर सायगांव मध्ये कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असून मुंबई हुन एक जूलैला आलेल्या साठ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर यांनी दिली आहे. जावलीतील जनतेने अधिक सतर्क रहावे असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  सतीश बुद्धे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page