मार्ली घाटात छिन्न विच्छिन्न अवस्थेत पडलेला महिलेचा म्रतदेह
जावली तालुक्यातील मार्ली घाटात अज्ञात महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला ;महिन्यातील अशा दुसर्या घटनेने खळबळ,
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील मार्ली घाटात वीस दिवसांपूर्वी पुरुष जातीचा एक अज्ञात मृतदेह आढळला होता.या म्रतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.असे असतानाच आज त्याच जागे पासून काही अंतरावर दुसरा म्रतदेह आढळल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.हा खून आहे की आत्महत्या याबाबत जनतेतून संशय व्यक्त होत आहे.या घटनेचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.
या महिन्यात ११ आँगष्ट रोजी पोलिसांना मार्ली घाटात एक म्रतदेह आढळला होता.गेल्या वीस दिवसात या म्रतदेहाची ओळख पटलेली नाही. किंवा तालुक्यातील कोणी हरवल्याची तक्रार पोलिसठाण्यात दाखल झालेली नाही. त्यामुळे लोकांची फारशी वर्दळ नसणाऱ्या या घाटात नेमकं काय घडतय याबाबत लोकांमधून संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मार्ली घाटात आज एक म्रतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार कुडाळ पोलिस दूरक्षेत्राचे सहा.पोलिस उपनिरीक्षक सूर्यकांत शिंदे व करहर पोलिस ठाण्यातील हवालदार डी.डी.शिंदे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सदर स्त्री जातीचा म्रतदेह सडलेल्या अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील,वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके,मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांनी भेट देऊन घटना स्थळाची पाहणीकरुन सूचना केल्या.
सदर म्रतहेहाच्या मुंडक्याची कवटी धडावेगळी पडली होती. म्रतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने शीर तोडून महिलेला मारुन टाकण्यात आले की जंगली प्राण्यांनी शीर ओरबडले याबाबत साशंकता आहे. सदर महिलेच्या अंगावर साडी व स्वेटर घातलेला आहे. या म्रतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.हा म्रतदेह पंधरा ते वीस दिवसांपूर्वीचा असावा असा अंदाज असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान एका महिन्यात सलग दुसरी घटना आणि ठिकाण जवळ पास तेच आणि घटना घडलेच्या दिवसांचा ताळमेळ पाहता या दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या परिचित असण्याची शक्यता सुद्धा घटनास्थळी लोकांकडून वर्तवली जात होती.त्यामुळे या घटनेचा शोध घेण्याचे मोठे आव्हान मेढा पोलिसांपुढे आहे.अधिक तपास कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे यांच्या मार्गदर्शनाखाली करहर पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार डी.डी.शिंदे करत आहेत.