जावली तालुक्यात आँगष्ट महिन्यात तब्बल ३१६ बाधित ; ६ कोरोना बळी,
एकूण – ७४५, बळी २१, डिस्चार्ज ५९६,अँक्टिव्ह १२८
आज २९ जण कोरोना बाधित
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज अखेर एकूण ७४५ जण कोरोना बाधित झाले असून ५९६ जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.एकूण २१ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.३१ आँगष्ट अखेर १२८ जण अँक्टिव्ह आहेत.
जावली तालुक्यात आज २९ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे .यामध्ये बामणोली त. कुडाळ १,कसबे बामणोली १, मेढा १७,गवडी १,हुमगांव १,जवळवाडी २,बीभवी १,आंबेघर तर्फे कुडाळ ५ यांचा समावेश आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
तालुक्यातील एकूण ७४५ कोरोना बाधितांपैकी आँगष्ट महिन्यात तब्बल ३१६ जण कोरोना बाधित झाले असून या महिन्यात ६ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. अशी गंभीर परिस्थिती निर्माण होत असतानाच अन् लाँकमध्ये मिळालेल्या सवलतींमुळे लोक कोरोना हद्दपार झाल्याच्या अविर्भावात वावरत आहेत. आणि यामुळेच एका महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक कोरोना बाधित झाले आहेत.
मुंबई पुण्याचे लोक येण्यामुळे कोरोना आपल्या गावी येईल या भितीने या चाकरमान्या आपल्याच भूमीपुत्रांवर नियमांची सक्ती करणारे स्थानिक आता मात्र सर्व नियम ढाब्यावर बसवत आहेत. मुंबई कर आले आणि पुन्हा आपल्या रोजगारासाठी परत गेले सुद्धा .मुंबई करांच्या येण्याने आणि त्यांनी आपल्या गावच्या लोकांच्या काळजीमुळे नियम पाळल्यामुळे कोरोनाचा फैलाव झाला नाही. परंतु आता स्थानिकांच्या बेशिस्तिला लगाम कोण घालणार हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
जावली तालुक्यातील १२५ गावांपैकी तब्बल ७१ गावांमध्ये कोरोनाने हजेरी लावली आहे.यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणारी गावे कोरोना बाधितांची संख्या व कंसात बळींची संख्या पुढील प्रमाणे.
केळघर – आंबेघर तर्फ मेढा १७, ओझरे ५(१),केडंबे १, केळघर ६,गवडी ९(२), पुनवडी १६१(२),भणंग ५, मेढा २८, भूतेघर २(१), जवळवाडी १५ ,बिभवी १८ , रिटकवली ६ ,वरोशी ९(१) , एकूण गावे १३,बाधित २७९, बळी ५,अँक्टिव्ह ५१.
कुडाळ – आखेगणी ४,दापवडी १७,करहर ३,काटवली ३ , कावडी ४,बामणोली २ ,बामणेवाडी ३ , रांजणी ३(१),रामवाडी ३२(१) , वहागाव २(१),पार्टेवाडी १ ,कुडाळ ४६(१) , सोमर्डी १,महू १,कोलेवाडी ५, गावडेवाडी २ ,आंबेघर , हुमगांव ९, शेते १, शिंदेवाडी २, एकूण गावे २० ,बाधित १४२ , बळी ५ , डिस्चार्ज १२१, अँक्टिव्ह १६,
कुसुंबी – आखाडे वस्ती ३(१),गांजे ४(१),निझरे ४ ,म्हाते खुर्द ४ ,कुसुंबी ९,म्हाते मुरा २, एकूण गावे ६ , बाधित २६, डिस्चार्ज २० , बळी २, अँक्टिव्ह ४
सायगांव – धोंडेवाडी५ , प्रभुचीवाडी ४ ,बेलावडे ५(१), मार्ली १ , मोरघर २९(२),सायगांव २५(३),आलेवाडी ४, रायगांव ७,दुदुस्करवाडी ७३(१) , खर्शी त. कुडाळ ४,रानगेघर २,दरे खु.५,नेवेकरवाडी ३, येरूनकरवाडी ३,महिगाव १९ , गणेशवाडी ७(१),दरे बु.१, सायगांव ,आनेवाडी १८ , भिवडी ५,सरताळे ९ एकूण गावे २१ , बाधित २३३ ,डिस्चार्ज १९९ , बळी ८ अँक्टिव्ह २६.
क.बामणोली – आपटी १ , काळोशी २, कास ८ ,केळघर त.सोळशी २(१) ,तोरणेवाडी ३, निपाणी २ ,मुनावळे ६, तेटली ४ ,पावशेवाडी १ ,बामणोली १,सावरी ६.एकूण गावे ११, बाधित ३६,डिस्चार्ज ३३, बळी १,अँक्टिव्ह २
दरम्यान जवळ पास गेले सहा महिने कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. शासनाच्या विविध योजना आणि आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर मिनाज मुल्ला, तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते, सपोनि निळकंठ राठोड व त्यांची संपूर्ण टीम, अंगणवाडी सव आशा सेविका. या बरोबरच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी कसोसीने प्रयत्न केला.यामध्ये यातील अनेक कोरोना योद्धे कोरोना बाधित झाले. तर एका अंगणवाडी सेविकेचे प्राण गमावले. परंतू आता अन् लाँकमध्ये कोरोना बाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. आता प्रत्येकाने स्वतः चे आणि आपल्या परिवाराचे कोरोना पासून रक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. “मीच माझा रक्षक.” जबाबदार जावली कर.