Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज कोरोनामुळे दोन मृत्यूंची नोंद ; ६ पाँझिटीव्ह ; ४४...

जावली तालुक्यात आज कोरोनामुळे दोन मृत्यूंची नोंद ; ६ पाँझिटीव्ह ; ४४ डिस्चार्ज

एकूण -१३९१, डिस्चार्ज १०८२, बळी ३७ , अँक्टिव्ह २७२

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात शनिवारी जवळवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष व रविवारी मेढा येथील ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यात कोरोना बळींची संख्या ३७ वर पोहचली आहे.आज  अँन्टीजेन टेस्ट मध्ये  सोनगाव २, व मेढा ४ असे सहा जणांचे अहवाल कोरोना बाधित आला आहे.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

           ४  एप्रिलला जावली तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर पाच महिन्यात ७४५ जण कोरोना बाधित झाले होते तर २१ जणांचा कोरोना मुळे  मृत्यू   झाला होता. सप्टेंबर महिन्यात  वीस तारखे पर्यंत कोरोनाने तब्बल  ६४०  जण कोरोना बाधित झाले असून १६ जणांचा बळी घेतला आहे. कोरोनाने धारण केलेले हे विक्राळ रुप पाहता प्रत्येकाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘काळजीपूर्वक घेणेच हितावह ठरणार आहे. ही आकडेवारी केवळ नोंदणीकृत आहे. 

केवळ सामाजिक भिती मुळेच लपवला जातोय आजार 

          लोकांमध्ये कोरोना आजारा पेक्षा सामाजिक भिती अधिक असल्याचेच बोलले जात आहे. त्यामुळे आजार लपवला जात आहे. कोरोना चाचणी करण्यासाठी अजूनही लोक तयार होत नाहीत. लक्षणे नसलेले कोरोना बाधित खुलेआम फिरत आहेत. तर होम आयसोलेशनचे तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापर व सोशलडिसटेंसिगचे नियम पाळले जात नाहीत.त्यामुळेच कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.आता लक्षणे नसलेले बहुतांश कोरोना बाधित होम आयसोलेशन होत आहेत.राजकीय , सामाजिक नेते ,कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था मदती साठी पुढे येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page