सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज कोरोना बाधितां पेक्षा कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या दिलासा दायक आहे.परंतू तालुक्यात नव्याने तयार होणारा साखळ्या शोधून त्या तोडण्याचे आव्हान कायम आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.१२ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.१३ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये २२ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज तब्बल ८२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.आज अखेर २१३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून तालुक्यात २२७ अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आहे.
आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे ; केळघर त.सोळशी ७,महू ४,सोमर्डी १, गाळदेव १,आनेवाडी १,मानकरवाडी ७,रायगांव १ एकूण २२.