Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज दोघांचा कोरोनामुळे बळी ; आज ४० जणांचे अहवाल...

जावली तालुक्यात आज दोघांचा कोरोनामुळे बळी ; आज ४० जणांचे अहवाल कोरोना बाधित

एकूण – १०९१ , बळी २७, डिस्चार्ज ७५९ ,अँक्टिव्ह ३०७

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज  मोरघर येथील ६५ वर्षीय पुरुष व सायगांव येथील ५६ वर्षीय पुरुषाचा  कोरोनाने बळी घेतला. बळींचा आकडा २७ वर पोहचला आहे. 

         आज घेण्यात आलेल्या अँन्टीजेन टेस्ट मध्ये उंबरवाडी १४, म्हसवे १, बामणोली तर्फ कुडाळ १, म्हावशी १  अशा सतरा जणांचे अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आले आहेत. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

         दरम्यान तालुक्यातील  १२८ जणांच्या स्वाब चे अहवाल नुकतेच प्राप्त झाले यात कुडाळ १, पिंपळी २,  हुमगांव १, सोनगांव २, सायगांव ३, बामणोली तर्फ कुडाळ २, म्हावशी ७,  मेढा ३, भणंग १,  रिटकवली  १,  रानगेघर  १, अशा तेवीस जणांचे अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आले आहेत .अशी माहिती  तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली.जावली तालुक्यातील  दहा गावात आज अकरा ठिकाणी कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला

       जावली तालुक्यातील घोटेघर, रानगेघर, केंडंबे,बामणोली तर्फ कुडाळ, डेरेवाडी,मेढा प्रभाग ७,  म्हावशी,सावली,म्हसवे, जवळवाडी २ ठिकाणी या  दहा गावात  कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील दहा गावात कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी  निर्धारित नियमानुसार अकरा ठिकाणी कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.

उंबरीवाडी बनले कोरोनाचे हाँटस्पाँट

          जावली तालुक्यातील जेमतेम अडिचशे लोकसंख्येच्या गावात आज अखेर तब्बल ५२ लोक कोरोना पाँझिटीव्ह असून हे गाव आता कोरोनाचा हाँटस्पाँट बनले आहे. या गावात दि.४ रोजी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले होते.यातील एक जण मुंबई हुन आला होता. त्यानंतर या गावात कोरोना साखळीच तयार झाली. दररोज कोरोना बाधितांच्या निकट संबंधित लोकांची  टेस्ट घेतली असता दररोज बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आज अखेर उंबरीवाडीत १३२ कोरोना टेस्ट घेण्यात आल्या असून एकूण ५२ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.अशी माहिती कसबे बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांनी दिली.

         ऐन पावसाळ्यात या दुर्गम भागात ही साखळी तोडण्याचे मोठे आव्हान होते. डॉ ज्ञानेश्वर मोरे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कसबे बामणोली यांनी या नैसर्गिक परिस्थितीत करत असलेले काम कौतुकास्पद असेच आहे.

संकटात मदतीचे हजारो हात पुढे

योगेश जेधे यांनी दिलेली आँक्सिजन मशीन कोरोना बाधितांसाठी संजीवनीच ठरली,एका रुग्णाचे वाचले प्राण

        सायगांव तालुक्यातील योगेश उर्फ पप्पू जेधे यांनी त्यांची बहिण कै विद्या अतितकर यांच्या स्मरणार्थ दिलेली आँक्सिजन मशीन कोरोना बाधितांचा जीव वाचवण्यासाठी संजीवनीच ठरली. या मशीनच्या माध्यमातून रायगांव येथील कोरोना केअर सेंटर मधील एका अत्यवस्थ रुग्णाचे प्राण वाचले.

           दरम्यान कोरोना बाधितांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक दानशूर व्यक्तींचे मदती साठी हात पुढे येत आहेत. हे संकट खूप मोठे असून दीर्घकाळ राहणारे आहे. आपण निर्माण केलेल्या सुविधा आपल्याच ज्ञाती बांधवांना उपयोगी ठरणार असल्याने जास्तीत जास्त लोकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 जीवनमित्र फाउंडेशन च्या वतीने एक आँक्सिजन मशीन आरोग्य सेवेत दाखल     

जिवलग मित्र परिवाराचे सदस्य,एल आय सी चे विकास अधिकारी आणि मी एक जबाबदार जावलीकर चे मार्गदर्शक मा सोमनाथ काशीलकर साहेब यांनी त्यांच्या जीवनमित्र फाउंडेशनच्या वतीने कै भानुदास देशमुख यांच्या स्मरणार्थ ऑक्सिजन मशीन भेट देत आहेत .

        कोरोनाच्या आजच्या भीषण परिस्थितीत ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा जीव जात आहे. या मशिनमुळे अनेकांचा जीव वाचवण्यास मदत होणार आहे.

 बाहुले ग्रामस्थांची दहा हजारांची मदत 

केडबे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास तेथील आरोग्य  सुविधांची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी बाहुळे ग्रामस्थांनी केडबे  ग्रामस्थांना दहा हजार. रुपये मदत केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page