कुडाळ दि.२४ .जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि. २३ रोजी रात्री २७ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.
यामध्ये कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे खिरकंदी १,आंबेघर तर्फे मेढा १,गवडी १, ओखवडी ७ , कुडाळ ६ , म्हसवे १, भिवडी २,रायगांव १,सरताळे ४, सायगाव ३ एकूण २७. तालुक्यात सध्या १६८ अॅक्टिव्ह कोरोना बाधित आहेत.