HomeTop Newsजावली तालुक्यात कोरोनाची अँन्टीजेन टेस्ट सुविधा सुरु ;

जावली तालुक्यात कोरोनाची अँन्टीजेन टेस्ट सुविधा सुरु ;

 एकूण २८१, बळी १२, मुक्त १४२,  अँक्टिव्ह १२७ . 

पुनवडी – ११३ + आज ४ बाधित

जावली तालुक्यात कोरोनाची अँन्टीजेन टेस्ट सुविधा उपलब्ध ; कोरोना अहवाल आता केवळ अर्ध्या तासात

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कोरोनाचा हाँटस्पाँट बनलेल्या पुनवडी गावातील संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन गतिमान झाले आहे. कोरोना अहवाल तात्काळ उपलब्ध होण्यासाठी आज जावली तालुक्यात सातारा जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाच्या वतीने अँन्टीजेन टेस्ट सुविधा भणंग येथील केंद्रात सुरु करण्यात आली आहे. या टेस्ट किटच्या माध्यमातून केवळ अर्ध्या तासात कोरोना अहवाल मिळत असल्याने तात्काळ उपाययोजना करून संभाव्य संसर्ग टाळणे शक्य होणार आहे.सध्या जावली तालुक्यासाठी दोनशे किट देण्यात आली असून आवश्यकतेनुसार अजून किटची मागणी करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.

           आज  ११५ टेस्ट किट द्वारे पुनवडीतील सहवासित लोकांची टेस्ट करण्यात आली . यामध्ये चार लोकांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. या बाधितांना पुढील उपचारासाठी कोरोना केंद्रात पाठवण्यात आले आहे.  दरम्यान अँन्टीजेन टेस्ट किटद्वारे जर लक्षणे असणाऱ्या व संभाव्य संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांचे अहवाल पुणे येथे तपासणी साठी पाठवण्यात येणार आहेत. पुनवडीची लोकसंख्या ५९१  असून १३८ लोक मुंबई हुन आलेले आहेत. उद्या रविवारी उर्वरीत सर्वांचे स्वाब तपासणी पूर्ण होऊ शकेल  अशी माहिती जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

 जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या लोकांना अँन्टीजेन टेस्ट सक्तीची आवश्यकता

        सातारा जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात कहर केला आहे. कोरोना बाधितांची दररोजची वाढती आकडेवारी पाहता यापुढे जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या लोकांना अँन्टीजेन टेस्ट सक्तीची करणे आवश्यक आहे. ही टेस्ट शासनाने सर्वसामान्य जनतेला सवलतीच्या दरात जिल्हयाच्या प्रवेश द्वारांवर तसेच तालुका पातळीवर उपलब्ध करून दिल्यास कोरोना संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. 

पुनवडीला उपविभागीय अधिकार्यांची भेट

पुनवडीला सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी भेट दिली. कोरोना बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः पुढे येऊन  प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

जावलीतील कसबे बामणोली ला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला

            जावली तालुक्यातील कसबे बामणोली – पावसेवाडी येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार कसबे बामणोली या गावाला  कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे. 

  बिरामणेवाडी चे कन्टेमेंट झोनचे  निर्बंध शिथिल

           जावली तालुक्यातील खर्शी बारामुरे ग्रामपंचायत अंतर्गत बिरामणेवाडी या गावांत कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण आढळल्याने कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतू निर्धारित कालावधीत या गावांत अन्य कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने  जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार या  गावातील कन्टेमेंट झोन चे निर्बंध शिथील करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular