Saturday, June 13, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात कोरोनाची आगेकूच सुरुच ;मोठ्या गावांनी सावरण्याची आवश्यकता

जावली तालुक्यात कोरोनाची आगेकूच सुरुच ;मोठ्या गावांनी सावरण्याची आवश्यकता

आज डिस्चार्ज २९१, बाधित ११३

एकूण – बाधित ५७०३ , डिस्चार्ज ४५९१ , मृत्यू १३१ ,अॅक्टिव्ह ९८१

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज तब्बल २९१जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.तर ११३ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या असणार्या कुडाळ,मेढा ,केळघर या गावांनी सावरण्याची अधिक आवश्यकता आहे.

         जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१ रोजी घेतलेले स्वाब व दि.२ रोजी घेतलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये तालुक्यातील कोरोना पाॅझिटीव्ह अहवाल ; बामणोली कसबे १,पावशेवाडी १,आंबेघर तर्फे मेढा १,आसणी ४,भणंग ३, जवळवाडी १ ,केडंबे १ ,केळघर १,मामुर्डी ५,मेढा १५, ओझरे ३,तळोशी ८,वाहिटे १,आखेगणी ३, बामणोली तर्फे कुडाळ ३ ,घोटेघर ४,हुमगांव ३ , खर्शीबारामुरे ७ ,कुडाळ २७ ,म्हसवे १,पिंपळी ४ ,शेते १,वालुथ १,गांजे १,कुसुंबी १,मोहाट ४,पाटणेमाची १,सायळी १,आनेवाडी १,बेलावडे १,दरे बु. २,दुदुस्करवाडी.१ ,मोरघर १, एकूण ११३. आज कोणत्याही मृत्यू ची नोंद झाली नाही ही समाधानाची बाब आहे.

          कुडाळ बाजारपेठेत आज पासून ग्रामपंचायत कुडाळ, आपत्ती व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी आठ दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.बाजारपेठांतील दुकानं बंद ठेऊन व्यापारी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.लोकांनीही विनाकारण बाहेर फिरु नये असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन समितीने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page