सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. परंतु गेल्या दोन दिवसांत बाधितांना आकड्यांत वाढ होत आहे.तालुक्यातील नेवेकरवाडी सध्या कोरोनाच्या हाॅटस्पाॅटवर दिसून येत आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.११ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.१२ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ३९ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज ३४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.तालुक्यात २८७ अॅक्टिव्ह कोरोना बाधित आहेत.एप्रिल व मे महिन्यातील तीन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तालुक्यातील कोरोना मृत्यूचा आकडा २१३ झाला आहे.
आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; कुडाळ ३, म्हसवे २,रांजणी ४,रुईघर १,वागदरे ६,आनेवाडी २,नेवेकरवाडी १४, प्रभूचीवाडी १,सायगांव २,सरताळे १,सायगांव ३ एकूण ३९.
कोरोना नियमांचे पालन करा.दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवा.मास्क वापरा.गर्दी करु नका.कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्या.”कोरोना मुक्त परिवार, सुखी परिवार”
Very well Nice