Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट ; पण सावधगिरी आवश्यक

जावली तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट ; पण सावधगिरी आवश्यक

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात गेल्या दोन दिवसांत कोरोना बाधितांच्या आकड्यात घट झाली आहे.परंत अगोदरही अनेकदा कोरोना बाधितांच्या  आकड्यात चढ-उतार झाले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे हा विकेंड दिलासा असू शकतो .आता अंशतःअन् लाॅक झाले आहे.त्यातच खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.कामाच्या घाईगडबडीत कोरोनाच्या संकटाकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही.सावधगिरी बाळगणेच हितावह ठरणार आहे.

           जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ५ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि. ६ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये २९ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज ५४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.तालुक्यात ४९८ अॅक्टिव्ह कोरोना बाधित  आहेत.

        आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ;बिभवी १,केळघर १, खर्शीबारामुरे १,महू १२, रांजणी २,दिवदिववाडी ४, पिंपरी तर्फे मेढा २,वागदरे २,आनेवाडी २,रायगांव १,सायगांव १ एकूण २९.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page