सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ झाली आहे. लोकांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.नेवेकरवाडीत आज तब्बल १६ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे त्यामुळे येथील संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि. १४ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.१५ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ३९ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज २६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.आज तीन कोरोना मृत्यूची नोंद करण्यात आली असून कोरोना मृत्यूचा आकडा २२२ झाला आहे.तालुक्यात २४६ अॅक्टिव्ह कोरोना बाधित आहेत.
आजच्या अहवालात सावरी १, कुडाळ १,पानस १,रुईघर १,वहागांव १,आनेवाडी ३,दरे बु.२, नरफदेव १,नेवेकरवाडी १६ ,रानगेघर १,सायगांव ५,सरताळे १, सोनगाव ५ एकूण ३९.