Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा शंभरी पार;

जावली तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा शंभरी पार;

एकूण ; बाधित ७०७४, डिस्चार्ज ६२१४, मृत्यू १८३, अॅक्टिव्ह ६७७

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोना बाधितांच्या आकड्यांचे आज पुन्हा शंभरी पार केली.गेले चार दिवस सत्तर वर स्थिरावलेला आकडा कमी येईल असे वाटत असतानाच आज पुन्हा कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण संख्येत वाढ होत आहे .सर्वांनी काळजी घ्यावी.नियम पाळावेत व सुरक्षित रहावे.

        जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.१८ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व अॅन्टीजेन टेस्ट मध्ये तब्बल ११३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज ७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.मे महिन्यात झालेल्या तीन मृत्यूची नोंद आज झाली आहे.आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे खिरखिंड १,पावशेवाडी क.१,आंबेघर तर्फे मेढा २,बहुले १, भणंग २,बिभवी १,डांगरेघर ६,केळघर १३,मेढा ६,मोरावळे २,वाळंजवाडी ११,वरोशी २,घोटेघर २, खर्शीबारामुरे ३, कुडाळ १८,सायघर १,शेते २, सोमर्डी ३,वहागांव २,दिवदिववाडी १,धुंद १,कुटुंबीय ६,म्हाते बु.५,आनेवाडी ३,बेलावडे ४,भिवडी १, इंदवली १,खर्शी त.कुडाळ ५,मरडमुरे १,मोरघर १, प्रभूचीवाडी १, सर्जापूर ३,सरतापे १. एकूण ११३ यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page