कुडाळ – जावली तालुक्यातील नेवेकरवाडीतील कोरोना साखळी तोडण्यासाठी गावातील सर्व म्हणजेच तब्बल साडेचारशे लोकांची तपासणी केली.यामध्ये आज आणखी सोळा जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.या गावातील साडेचारशे पैकी १२० लोकांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आहेत.याशिवाय या महिन्यात आनेवाडी आणि सोनगाव या गावात कोरोना बाधित आढळत असल्याचे दिसून येत.त्यामुळे या गावात आरोग्य विभागाने अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात आज ४२ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज २३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली.तालुक्यात ३१३ अॅक्टिव्ह कोरोना बाधित आहेत.
आगलावे वाडी १,आंबेडकर तर्फे मेढा १,बाहुले १,करहर २कुडाळ ३,पानस १,रांजणी २,सोमर्डी १,पिंपरी तर्फे मेढा १,वागदरे १, इंदवली १,नेवेकरवाडी १६, सोनगाव ३, सरताळे १ .एकूण ४२.
