कुडाळ मध्ये सरासरी ७३ टक्के मतदान
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आज मतदान शांततेत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सपोनि अमोल माने यांनी सांगितले.
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुडाळ ग्रामपंचायतीसाठी तिरंगी लढत असल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.पंधरा जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
आज एकूण ५२१६ मतदारां पैकी ३७९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.कुडाळचे वाँर्ड निहाय मतदान हनुमान वार्ड क्र.१- ९३०/६९८,नेताजी वाँर्ड क्र.२- १०९०/७९२, लक्ष्मी वाँर्ड क्र३-११७९/८५०, शिवाजी वाँर्ड क्र.४-९८७/६५४, तानाजी वाँर्ड क्र.५- १०३०/८०२.असे आहे.
याशिवाय भालेघर, बेलावडे, अंधारी /कास, या गावातून एकही उमेदवार बिनविरोध निवडून न आल्याने सर्व जागांवर अटीतटीची लढत झाली.उर्वरीत ग्रामपंचायतीसाठी काही जागांवर अंशतः निवडणूक झाली. मतदानासाठी सकाळ पासुनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
मतमोजणी सोमवार दि. १८ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून तहसीलदार कार्यालयात होणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी दिली आहे.