मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याची मागणी

सूर्यकांत जोशी कुडाळ – कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी केलेल्या लाँकडाऊन मध्ये देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती.केंद्र सरकारने आता हे निर्बंध हटवले आहेत परंतु महाराष्ट्रातील सरकार मंदिरे उघडण्यासाठी परवानगी देत नाही. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहचत आहे. त्याच बरोबर या मंदिरांच्या माध्यमातून लाखो प्रपंच चालत असतात. आता अन् लाँक मध्ये योग्य नियमावली ठेवून मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत या मागणी साठी भाजपाचे जावली तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नेतृत्वाखाली व मेढा नगरपंचायतीचे भाजपा नगरसेवक श्री विकास देशपांडे यांच्या नियोजनाखाली मेढाचौकातील पुरातन श्री मारूती मंदीरासमोर भाजपा जावलीच्या पदाधिकार्यांनी महाआरती व घंटानाद करण्यात आला.
या आंदोलनात भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री विठ्ठल देशपांडे , उपाध्यक्ष भानुदास ओंबळे , सरचिटणीस विकास सणस, सचिव प्रदीप बेलोशे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर देशमुख, जेष्ठ नागरीक आघाडीचे तालुका संयोजक सदाशिव जवळ, मेघराज बेलोशे, नगरसेवक विकासजी देशपांडे, भाजपा
माजी सरपंच सुजितजी जवळ,संतोषजी वारागडे,प्रशांतजी करंजेकर,दादा कोडुळकर,नाना कदम,संजयजी पाटील,गणेशजी वंजारी वा भाविकांनी एकत्रित येत आंदोलनात सहभाग घेतला.
कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गेले सहा महिन्यांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन मधून जात असताना पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन महिन्यांपासून देशाची आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक घडी पूर्ववत होण्यासाठी अनलॉकची प्रक्रिया चालू आहे.
त्यानुसारच सुरक्षीततेचे विविध नियम पाळून दुकाने, बाजार, खाजगी व सार्वजनिक वहातूक चालू केली आहे . इतकेच काय पण महसूल मिळविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दारूची दुकाने प्राधान्याने सुरू केली आहेत. परंतु लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेली पवित्र अशी धार्मिक स्थळे, मंदीरे आजपर्यंत टाळेबंद आहेत. हिंदू धर्मियांच्या पवित्र अशा श्रावण महान्यात पूजाअर्चा , अभिषेकासाठीही गावोगावची लहानमोठी मंदीरेही बंदच होती. त्यामुळे अनेक लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत.
मंदीरे ही केवळ लोकांची श्रद्धास्थाने नसून , समस्त परिवारास मनःशांती देणारी आध्यात्मिक केंद्र आहेत.मंदीराच्या अर्थव्यवस्थेशी संलग्न असणाऱ्या विविध जातीधर्माच्या लोकांच्या चरितार्थाचे व जीवनशैलीचे साधन देखील आहेत.
मंदिराच्या अर्थव्यवस्थेवरच अवलंबून असणारे पुजारी, गुरव, ब्राम्हण , गोंधळी, स्वामी,वाघ्या- मुरळी, पौराहित्य करणारे त्याचप्रमाणे मंदीर परिसरात हार फुले विकणारे,माळी, हार बनविणारे, फुले पीकवणारे शेतकरी, प्रसादाच्या वस्तू बनवणारे विक्रेते यांची संख्या लाखोच्या घरात आहे. अशा सर्वच समाजघटकांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.अशा हातावर पोट असणाऱ्या वर्गाला राज्य शासनाने कोणत्याही आर्थिक स्वरूपाची मदत केलेली नाही.
त्यामुळे मंदीरे -धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे पीडीत असणाऱ्या लोकांकडून मंदीरे उघडण्यासाठी जनभावना तीव्र झाली आहे.तीच भावना भारतीय जनता पार्टी जावली तालुका यांचेवतीने आजच्या या घंटानाद आंदोलनाचे स्वरूपात महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी व गावोगावी बंद असलेली वाविध देवदेवतांची मंदीरे सोशल डिस्टंस पाळून उघडी करण्यासाठी , भजन कीर्तन, पूजा-अर्चा पूर्ववत चालू करण्यासाठी मागणी करण्यात आली.
खूपच छान बातमी.