
सूर्यकांत जोशी कुडाळ -राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक व जावली महाबळेश्वर तालुका शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदे व जावली राष्ट्रवादी श. प. पक्षाचे उपाध्यक्ष धनंजय पोरे यांनी आज ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हेमंत शिंदे यांच्या प्रवेशामुळे कुडाळच्या राजकारणाला कलाटणी मिळणार असून प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाला अधिक बळकटी येणार आहे.
जावळी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती हेमंत शिंदे, व त्यांचे सहकारी कुडाळ ग्रामपंचायत सदस्य गौरव शिंदे, जावली तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष धनंजय पोरे, यांच्यासह अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांचा नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर प्रतापगड कारखानाचे चेअरमन सौरभ शिंदे यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी हेमंत शिंदे यांनी सामांजस्याची भूमिका घेत भारतीय जनता पार्टीत ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या सर्वांचे नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात स्वागत केले.
*हेमंत शिंदे यांच्या प्रवेशाने जावलीत भाजपाची ताकद वाढेल.ना. शिवेंद्रसिंहराजे*
प्रतापगड चे चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या हेमंत शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षामध्ये योग्य तो मानसन्मान दिला जाईल तसेच आगामी काळात पक्ष संघटनेत देखील स्थान दिले जाईल.युवा नेतृत्व सौरभ बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आजचा पक्षप्रवेश झाला असून सौरभ बाबांना देखील आगामी काळात सर्वतोपरी ताकद दिली जाईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी बोलताना दिली.
कुडाळ गावचे शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे या गावातील रस्ते पाणी वीज कचरा इत्यादी मूलभूत गरजा योग्य त्या पद्धतीने निर्माण होणे आवश्यक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळत आहे. येणाऱ्या काळात पाचवड ते खेड असा होणारा कोकण महामार्ग तसेच जवळच असणारे पाचगणी महाबळेश्वर इत्यादी पर्यटन स्थळे यामुळे कुडाळ गावाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे त्यासाठी कुडाळ गाव विकासाच्या दृष्टीने कुठेही मागे राहता कामा नये यासाठी सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हेमंत शिंदे यांनी एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. असेही यावेळी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले .

हेमंत शिंदे यांच्या प्रवेशाने विकासाला गती : सौरभ शिंदे.
जावळी तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव असणाऱ्या कुडाळ मध्ये गेल्या काही वर्षात राजकीय अस्थिरता होते त्यामुळे गावच्या विकासात अडचणी येत होत्या विरोधाला विरोध केला जात असल्याने अनेक विकास कामे ठप्प होती हेमंत शिंदे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता गावचे राजकारणात फिरता येईल तसेच विकासाला गती येईल त्याचबरोबर तालुक्याच्या राजकारणात त्यांची सोबत महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची चेअरमन सौरभ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
*गावचा सर्वांगीण विकास हेच ध्येय : हेमंत शिंदे*
गेल्या पाच वर्षात कुडाळ गावात राजकीय अस्थिरता होती. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत कुडाळच्या जनतेने तीन पॅनलचे प्रत्येकी चार उमेदवार निवडून दिले त्यामुळे कोणत्याही पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले नाही त्याचा परिणाम गावच्या विकास कामावर झाला गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी एकत्र येणे गरजेचे होते त्यामुळेच सौरभ शिंदे यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून त्यांना पुढील राजकारणात साथ देण्यासाठी आपण नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आपण 1999 पासून राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांच्यासोबत निष्ठेने कार्य केले आहे. परंतु स्थानिक राजकारणाची गरज ओळखून आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.आमदार शिंदेसाहेब यांच्या सोबत कोणतेही मतभेद नाहीत. असेही हेमंत शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.