
— सूर्यकांत जोशी, कुडाळ
मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा, गुरुवार दि. ४ रोजी येणाऱ्या दत्त जयंती निमित्ताने कुडाळ तसेच पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये गुरुचरित्र पारायण सप्ताह अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने सुरू आहे. संपूर्ण परिसरात दत्तभक्तीचे मंगलमय वातावरण निर्माण झाले असून गावागावांतून होणारा नामसंकीर्तन, दत्तजयघोष आणि पारायणांचे स्वर वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करत आहेत.
शेकडो पुरुष, महिला तसेच युवक पारायण सोहळ्यांत सहभागी होत असून प्रत्येक ठिकाणी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतो. पारायण स्थळांवर मंडप उभारणी, बैठक व्यवस्था, चहा–नाश्ता, पिण्याच्या पाण्याची सोय, साफसफाई अशा सर्व सुविधा भक्तांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था व स्वयंसेवक या सोहळ्यासाठी मदतीचा हात देत असून सेवा हाच धर्म या भावनेतून ते सतत कार्यरत आहेत.
अध्यात्मिक पारायणामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख–शांती, मानसिक समाधान, सद्विचार आणि सदाचार वाढीस लागतो, हा मुख्य हेतू या उपक्रमामागे आहे. व्यसनाधीनता, अस्वस्थता, राग, असहिष्णुता यांसारख्या प्रवृत्तींपासून समाजाला योग्य दिशा देण्याचे सामर्थ्य अशा धार्मिक उपक्रमांत असते. जो गैरमार्गावर भटकला असेल त्याला सज्जनपणाकडे व सद्गुणांकडे घेऊन जाण्याची प्रेरणा या पारायणांतून मिळते, असा भक्तांचा अनुभव आहे.
गुरुचरित्र पारायण, ज्ञानेश्वरी पारायण तसेच विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर सकारात्मकतेकडे, भक्तीकडे आणि सामूहिक ऐक्याकडे वाटचाल करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा आध्यात्मिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे, त्यात सहभाग घेणे आणि पुढील पिढीपर्यंत संस्कार मूल्यांची परंपरा पोहोचवणे ही काळाची गरज आहे.
दत्तजयंतीच्या पावन पर्वाकडे वाटचाल सुरू असताना कुडाळ व पंचक्रोशीतील दत्तभक्तीची ही लाट निश्चितच समाजात प्रेम, शांतता आणि सद्भावाचा संदेश देणारी ठरत आहे.
Okay, gotta say, checking out okfunph was pretty smooth. The site’s easy to navigate, you know? Hoping my luck holds up here! Check it out yourself: okfunph