Tuesday, July 28, 2026
HomeTop Newsदिल्ली आंदोलनावरून....मेढा, कुडाळ बाजारपेठ  बंदला प्रतिसाद

दिल्ली आंदोलनावरून….
मेढा, कुडाळ बाजारपेठ  बंदला प्रतिसाद


   कुडाळ / प्रतिनिधी            

जंतर मंतर दिल्ली येथे NEET  परीक्षा पेपरफुटी व  विद्यार्थी आंदोलनावर दिल्ली  पोलीस यांनी अमानुषपने  लाठी हल्ला केला .या घटनेविरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.या आव्हानास  मेढा, कुडाळ  बाजारपेठेतील व्यापारी व नगरवासियांनी दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

        वंचित बहुजन आघाडी जावळी तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण बाजारपेठ फिरून  आज २३ जुले बंदचे आवाहन करण्यात आले होते.विद्यार्थी आंदोलनाकडे कोणत्याही जातीच्या चष्म्यातून नं बघता एक सुजाण नागरिक I am INDIAN  म्हणून २३ तारखेला बाजारपेठ बंद ठेवावी असे आवाहन जिल्हा सहसचिव योगेश कांबळे यांनी केले होते.    या अनुषंगाने मेढा व कुडाळ व्यापारी बांधव तसेच नगरवासियांनी मेढा व कुडाळ बाजारपेठ शंभरटक्के बंद  ठेवली होती .कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी मेढा  बाजारपेठेतील व्यापारांचे तसेच नगरवासियांचे तालुकाध्यक्ष प्रताप सपकाळ,युवा नेते आनंद जाधव यांनी आभार मानले.या बंद साठी जिल्हा उपाध्यक्ष मोहन खरात,अशोक दीक्षित,भारतीय बौध्द महासभेचे तालुका सचिव तात्या गाडे,हरीश चव्हाण, तालुका उपाध्यक्ष अशोक जाधव,शंकर वाघमारे, शामराव वाघमारे, तालुका  युवा आघाडीचे अध्यक्ष योगेश शिंदे,अशोक रोकडे,महाराष्ट्र रिपब्लीकन पार्टीचे अमन चव्हाण , आरपीआय गवई गटाचे युवा अध्यक्ष सूर्यकांत जाधव,अविराज परिहार,जितेंद्र परिहार,किरण खरात,प्रज्जीत गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

    कुडाळ बाजारपेठ शंभरटक्के बंद ठेवण्यासाठी उपसरपंच सोमनाथ कदम, महेश पवार,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रतापराव  सपकाळ, उपाध्यक्ष शंकर वाघमारे, सचिन कांबळे,संजय शेवते, संदिप कांबळे, सतिश कांबळे, निलेश कांबळे  व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

     या आंदोलनास मेढा व्यापारी संघटना,राष्ट्रवादी काँग्रेस  श.प., राष्ट्रीय काँग्रेस इत्यादी संघटनानी पाठिंबा दर्शवीला होता.     शासकिय कार्यालये, अत्यावश्यक  सेवा वगळता, सर्व बाजारपेठ बंद असल्याने, बाजारपेठेत शुकशुकाट होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page