Thursday, February 19, 2026
HomeTop Newsनाभिक समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

नाभिक समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सातारा दि . १४ : महाराष्ट्र नाभिक महामंडळ सातारा जिल्हा ,ओबीसी तसेच बारा बलुतेदार महासंघ यांच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोडो मारो आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले .

यावेळी जेष्ठ नेते भाऊ दळवी , बापूराव काशिद, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार नाभिक महामंडळाचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकरराव मर्दाने, ओबीसी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक संजय परदेशी, ओबीसी संघटनेचे जिल्हा महासचिव प्रमोद क्षिरसागर नाभिक महामंडळाच्या कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भानुदास वास्के चंद्रकांत जगताप आदी उपस्थित होते .
यावेळी भरत लोकरे शंकरराव मर्दाने विजय सपकाळ संपतराव पवार संजय परदेशी व विठ्ठल महाराज गायकवाड यांनी सांगीतले की केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेनी त्वरित माफी मागावी अन्यथा त्यांच्या घरा समोर प्रखर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देवून दानवेनी राजीनामा द्यावा अशीही मागणी केली . यावेळी दानवे विरोधात जोरदार घोषणा कार्याध्यक्ष अंबादास दळवी संतोष साळुंखे, किशोर काशिद महेश जाधव राजू निकम अजय काशिद , पांडूरंग राऊत रमेश पवार प्रकाश वास्के भरत झेंडे श्रीनिवास जाधव अशोक पवार यांनी दिल्या . तर दानवेंच्या प्रतिमेला जोडे मारून माजी नगरसेवक रणजीत साळुंखे शहराध्यक्ष योगेश साळुंखे निलेश साळुंखे, संदीप काशिद नितीन साळुंखे गिरीधर यादव अरुण खरे दिपक घाटगे विठुल जाधव दिलीप साळुंखे सुनिल झेंडे यांनी निषेध केला . यावेळी दानवेच्या विरोधात जोरदार निर्देशने केली .
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले .
या निवेदनात म्हटले आहे की केंद्रीय राज्य मंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा अपमान केला त्याबद्दल त्यांचा राजीनामा घेणे बाबत.
देशाचे केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपा चे माजी प्रदेशाध्यक्ष ना. रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून नाभिक समाजाचा अपमान केला आहे. राजकीय भाषणे देतांना यांना बहुजन समाजाला उद्देशुन भाषणे देण्यासाठी बहुजन समाजातील जाती यांच्या दाववेच्या जहांगीर नाहीत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यानी बहुजन समुहातील नाभिक समाजाचा निंदनीय शब्दात अपमान केला आहे.
यामुळे संपूर्ण राज्यातील नाभिक समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून आपन त्यांचा राजीनामा घ्यावा अथवा त्यांनी समाजाची केलेल्या बदनामी बद्दल जाहिर माफी मागावी असे निवेदन या अगोदर सुद्धा जिल्हाधिकारी मार्फ़त आपणास देण्यात आले होते परंतु त्यावर कुठलीही भूमिका घेण्यात आलेली नाही. करिता आज संपूर्ण राज्यभरात नाभिक समाजासह बहुजन समाजातील बरेच जात समुहांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली व जिल्हाधिकारी मार्फ़त आपणास निवेदन देत आहोत. जर येत्या ८ दिवसाच्या आत समाजाची माफी मागितली नाही तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी लाखोंच्या संख्येने राज्यातील नाभिक समाज गोळा होणार व त्यांच्या घरासमोर केस मुंडन आंदोलन केल्या जाईल. या पासून राज्यात कुठलीही विपरीत परिस्थिति निर्माण झाली तर त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे निवेदन देण्यात आले आहे .
सातारा : येथे रावसाहेब दानवेंच्या बॅनरला जोडो मारो आंदोलन करताना कार्यकते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page