Thursday, February 19, 2026
HomeTop Newsनामदार शिवेंद्रसिंहराजेंच्या परिसस्पर्शाने समाधान पोफळे यांच्या राजकीय कार्याला झळाळी :वसंतराव मानकुमरेसमाधान पोफळे...

नामदार शिवेंद्रसिंहराजेंच्या परिसस्पर्शाने समाधान पोफळे यांच्या राजकीय कार्याला झळाळी
:वसंतराव मानकुमरे
समाधान पोफळे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव:


सूर्यकांत जोशी कुडाळ –

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली समाधान पोफळे यांनी समाजासाठी दिलेल्या प्रामाणिक योगदानामुळेच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची अलोट गर्दी जमली आहे ही त्यांनी आज पर्यंत केलेल्या कार्याचे पोहोच असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते  वसंतराव मानकुमरे यांनी केले.
       सरपंच परिषदेचे अध्यक्ष समाधान पोफळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमर्डी तालुका जावली येथे त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात मानकुमरे बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, पंचायत समितीच्या माजी सभापती अरुणा शिर्के, उपसभापती रवींद्र परामणे, मंडलाध्यक्ष संदीप परामणे, मच्छिंद्र मुळीक अजय शिर्के ,रेश्मा पोफळे, समीर आतार, विकास धोंडे ,रणजीत शिंदे, राजेंद्र महाडिक, किरण भिलारे व कार्यकर्ते उपस्थित होते.
         वसंतराव मानकुमरे पुढे म्हणाले, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण तयारी झाली असून जावली तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती यामध्ये भारतीय जनता पक्षाचेच सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील. यावेळी आपल्या भाषणात मानकुमरे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर टीका न करता त्यांच्या बद्दल कौतुकाचे शब्द वापरले. त्यांनी आमदार शिंदे यांच्या विषयी उधळलेल्या स्तुती सुमनांमुळे   उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाला.यावेळी मानकुमरे यांनी शशिकांत शिंदे आमदार असताना म्हसवे गट बिनविरोध केल्याची आठवण करून देत यावेळी सुद्धा जर योग्य समन्वय आणि सामंजस्याची भूमिका घेतल्यास या गटातील संघर्ष टाळून बसवे गट बिनविरोध करता येईल अशी गुगली टाकली.
ना. बाबाराजे भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार    समाधान पोफळे
        राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची स्वच्छ प्रतिमा कर्तुत्व संपन्न व्यक्तिमत्व आणि पक्षीय पातळीवर असणारी विश्वासार्हता पाहता भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास समाधान पोफळे यांनी व्यक्त केला. आपणास वाढदिवस साजरा करण्याची हाऊस नाही परंतु यावेळी निवडणूक काळातच वाढदिवस आल्याने कार्यकर्त्यांनी या वाढदिवसाला मेळाव्याचे स्वरूप आणले गेले पंधरा वर्षे सामाजिक कार्यात आपण निस्वार्थीपणे सहभाग घेतला गावच्या सरपंच पदाच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास केला केवळ गावापुरतेच मर्यादित न राहता तालुक्यातील सरपंचांचे संघटन करून सरपंचांच्या अडीअडचणी मांडून सरपंच परिषदेला राज्यस्तरावरचे महत्त्व प्राप्त करून दिले शासनाकडून सरपंचांच्या अडचणी सोडवल्या येणाऱ्या काळात सुद्धा नामदार बाबाराजे यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ठ नेते वसंतराव मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजासाठी योगदान देणार असल्याचे यावेळी समाधान पोफळे यांनी स्पष्ट केले.
          प्रतापगड सहकार्याची साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी समाधान पोफळे यांच्या कामकाजाचे कौतुक केले पोफळे यांचे सामाजिक कार्यात असणारे योगदान त्यांना राजकारणात यश देण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे असे सांगितले यावेळी जावली पंचायत समितीच्या माजी सभापती अरुणा शिर्के ,उपसभापती रवींद्र परामणे ,मंडलाध्यक्ष संदीप परामणे यांच्यासह विविध मान्यवरांनी समाधान पोकळे यांच्या कार्याचा गौरव केला भाजपाचे नवोदित तालुका प्रवक्ते सुरेश गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page