सूर्यकांत जोशी कुडाळ – या आठवड्यात पोलिसांच्या दबंग कारवाईने विनाकारण रस्त्यावर फिरणारांचे चांगलेच धाबे दणाणले.त्यामुळे गेल्या दोन दिवसांत रस्त्यावर शुकशुकाट आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२८ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.२९ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ७३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज ४० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तालुक्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आता ५८१ वर पोहचली आहे.आज या महिन्यातील दोन मृत्यूची नोंद झाली आहे त्यामुळे कौरोना मृत्यू चार आकडा २०१ झाला आहे.
दरम्यान अहवाल संकलनात काही जुन्या अहवालाच्या नोंदी चा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ;सावरी १,आंबेघर तर्फे मेढा १, मेढा १,रिटकवली ३, बामणोली तर्फे कुडाळ ५, हुमगांव २, खर्शीबारामुरे १, कुडाळ १,महू १,म्हसवे १०,सनपाने २,शेते ८,गांजे १,कुसुंबी २,आलेवाडी ७,आनेवाडी १४, बेलावडे १ – दि.१२/५/२१.दरे बु.१, करंदी त.कुडाळ १,करंदोशी २,महामुलकरवाडी १,सायगांव १, सरताळे ३,सायगांव ३. एकूण ७३.