Thursday, February 19, 2026
HomeTop Newsप्रतापगड कारखाना निवडणुकीत सौरभ शिंदेच हिरो ;

प्रतापगड कारखाना निवडणुकीत सौरभ शिंदेच हिरो ;

सहकार पॅनलची बचाव पॅनलवर २१/० ने मात  .

सूर्यकांत जोशी कुडाळ – सातारा जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थापक सहकार गोपॅनलच्या सर्व उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.या निवडणुकीत सभासदांनी सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.निवडणुक निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला.यावेळी २१/० सौरभ शिंदे हिरो या घोषणेने मेढा परिसर दणाणून गेला होता.

           प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार यांच्या नेतृत्वाखालील बचाव पॅनलने संस्थापक सहकार पॅनलला आव्हान दिले होते.गेले चार वर्षे कारखान्याचा गळीत हंगाम बंद असल्याने जावली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ससेहोळपट होत असल्याने नाराजीचा सूर उमटत होता.या नाराजीचा फायदा निवडणुकीत होण्याची शक्यता गृहीत धरून बचाव पॅनलने तयारी केली होती.परंतू सभासदांनी संस्थापक सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना बाराशे हुन अधिक मताधिक्याने विजयी करत हा प्रयत्न सपशेल हाणून पाडला.माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठा आजही सौरभ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले.

         संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी संस्थापक सहकार पॅनलच्या तीन जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित १८ जागांसाठी   रविवारी एकूण ३२१५ मतदान झाले होते.आज मेढा येथील बाबासाहेब शिंदे आखाडकर सभागृहात मतमोजणी करण्यात आली.यामध्ये संस्थापक सहकार पॅनलच्या १८ पैकी १८ जागा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या.निवडणुकित विजयी उमेदवार त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे ; शिंदे राजेंद्र रामचंद्र (२२२१), शिंदे सौरभ राजेंद्र (२१७९), शिंदे सुनेत्रा राजेंद्र (२१३५), मोहिते आनंदराव सदाशिव (२१२१), पवार शांताराम रामराव (२११७), शिवणकर अंकुश यादवराव (२१०५),पार्टे रामदास निवृत्ती (२१३०), शिंदे आनंदराव मानसिंग (२१४७),तरडे प्रदीप मारुती (२१२२),जुनघरे आनंदराव हरीबा (२१४४), मर्ढेकर शिवाजी साहेबराव (२११५),निकम बाळासो ‌गणपत (२११८),पार्टे गणपत रामचंद्र (२११०),सावंत जयवंत उर्फ नानासाहेब जनार्दन (२०६६),वांगडे दिलीप यशवंत (२०६९),निकम बाळकृष्ण लक्ष्मण (२२१३), गोसावी कुसुम लक्ष्मणगिरी (२१७७),शेवते विजय महादेव (२२०२), बिनविरोध निवड – बारटक्के शोभाताई प्रमोद,पोफळे ताराबाई ज्ञानेश्वर,मोरे विठ्ठल विष्णू.

सभासदांचा विश्वास सार्थ ठरवणार – सौरभ शिंदे

          या निवडणुकीत मतदारांनी आमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.त्यामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे.येत्या दिवाळीला प्रतापगड सहकारी साखर कारखाना सुरू करुन आदरणीय नेते शरद पवार यांच्या हस्ते गव्हानीत  मोळी टाकून हा विश्वास सार्थ ठरवणार आहे.माजी आमदार कै.लालसिंगराव शिंदे,माजी चेअरमन राजेंद्र शिंदे – भैय्या यांचे आशिर्वाद, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, जेष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या सह अनेक दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन , कारखान्याच्या कामगारांनी अहोरात्र घेतलेली मेहनत आणि सभासदांनी दाखवलेला विश्वास आणि प्रसंगी मतभेद विसरून दिलेली  साथ यामुळेच या निवडणुकीत हा मोठा विजय मिळालेला असल्याची प्रतिक्रिया संस्थापक सहकार पॅनलचे नेते व पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी व्यक्त केली.

            ही विजयाची घोडदौड यापुढेही अव्याहत सुरू राहील.आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही गुलाल आमचाच असेल अशी ग्वाही सौरभ शिंदे यांनी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर  दिली.

सलग चार वर्ष कारखाना बंद आहे म्हणूनच निवडणूक लढवली
दिपक पवार
सुमारे एक हजार सभासदांनी मला कौल दिलेला आहे पाचशे मते बाद झालेली आहेत तरीसुद्धा विजयी पॅनलचे मी मनापासून अभिनंदन करतो कोणत्याही प्रकारचा मनामध्ये आकस न ठेवता मी व माझे सहकारी विजयी संचालकांना भविष्यामध्ये कारखाना सुरू होण्यास सहकार्य करीन लवकरात लवकर साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांची गळचेपी थांबवावी हीच विनंती असल्याची प्रतिक्रिया दिपक पवार यांनी निवडणूक निकालानंतर दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page