Saturday, June 20, 2026
HomeTop Newsप्रभुचीवाडीत घरफोडी; रोख ७३ हजारांसह मुद्देमाल लंपास: जावळी तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ घरपोडीच्या...

प्रभुचीवाडीत घरफोडी; रोख ७३ हजारांसह मुद्देमाल लंपास: जावळी तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ घरपोडीच्या घटनांची मालिका सुरूच


सूर्यकांत जोशी | कुडाळ
जावली तालुक्यातील चार गावातील घरफोडीच्या घटना ताज्या असतानाच दिनांक 18 रोजी प्रभुचीवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व घरगुती साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभुचीवाडी येथील शेतकरी दिनकर हरिबा शिवणकर (वय ६५) यांच्या राहत्या घरात ही चोरी झाली. दि. १८ जून २०२६ रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १९ जून रोजी पहाटे १.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील गोठ्याचा सिमेंटचा दरवाजा फोडला. तसेच लाकडी दरवाजावरील कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
यानंतर चोरट्यांनी घरातील ७३ हजार रुपये रोख रक्कम तसेच ७ ते ८ जुन्या वापरातील साड्या असा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर शिवणकर यांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी मेढा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) व ३०५ अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार यादव करीत असून, परिसरातील संशयित हालचालींची माहिती नागरिकांनी पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घरफोडीमुळे प्रभुचीवाडी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page