Thursday, February 19, 2026
HomeTop Newsप्रशासनाच्या प्रयत्नांना जावलीकरांची साथ ; सोपान टोम्पे ;

प्रशासनाच्या प्रयत्नांना जावलीकरांची साथ ; सोपान टोम्पे ;

प्रशासनाच्या प्रयत्नांना जावलीकरांची साथ ; सोपान टोम्पे

जावली तालुक्यात कोरोना परतीच्या वाटेवर

सूर्यकांत जोशी कुडाळ : दि.८- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना जावलीकरांची सकारात्मक साथ मिळत आहे.त्यामुळेच कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होत आहे.बाधितांची स़ंख्या झपाट्याने कमी होत असली तरीही नवीन साखळी तयार होऊ नये यासाठी लोकांनी नियम पाळून दक्षता घ्यावी असे आवाहन जावलीचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी केले आहे.

         तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या आकड्यात घट होत आहे.त्यामुळे कोरोना परतीच्या वाटेवर असल्याचे दिसून येत आहे.परंतू अजुनही धोका कळलेला नाही.बाधित रुग्णांनी आपल्या पासून इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

          जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.६ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.७ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये २२  जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज तब्बल ७२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.तालुक्यात ४४८ इतके अजुन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.तालुक्याचा रिकव्हरी दर ९२.८ झाला असून अॅक्टिव्ह रुग्ण दर ५.४५ आहे.

         आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; मेढा १, कुडाळ ७,खर्शी तर्फे कुडाळ ३,वागदरे ३,कुसुंबी २, पिंपरी तर्फे मेढा १,दरे बु.४, इंदवली १  एकूण २२.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page