Monday, April 6, 2026
HomeTop Newsप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील च्या अडचणीत वाढ : अपघाताच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात...

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील च्या अडचणीत वाढ : अपघाताच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश

पुण्यातील गौतमी पाटीलच्या कार अपघात प्रकरणात ना. चंद्रकांत पाटील यांचा थेट हस्तक्षेप

सूर्यकांत जोशी कुडाळ : लोकप्रिय लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलच्या कारचा झालेला अपघात आता गंभीर वळण घेत आहे. या प्रकरणात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः हस्तक्षेप करून पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलिस दलातील डीसीपींना थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधला व दोषींवर कुठल्याही दबावाशिवाय कठोर कारवाई करण्यास सांगितले.

दरम्यान, पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी मात्र तीव्र संताप व्यक्त केला असून, गौतमी पाटीलला तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कुटुंबीयांचा आरोप आहे की, अपघाताच्या वेळी गौतमी पाटील ही कारमध्येच उपस्थित होती. या अपघातामुळे रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याचे उपचार सुरू आहेत. यामुळे स्थानिकांमध्येही मोठी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणाची चौकशी आणखी गतीमान होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, गौतमी पाटील यांचा याबाबतचा अधिकृत प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही.

या संपूर्ण घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रासह राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ माजली असून, गौतमी पाटीलला अटक होते की ती केवळ चौकशीसाठीच हजर राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page