
पुरस्कार हा प्रेरणा देणारा : अशा गावांचा आदर्श घेऊन सर्वच गावे समृद्ध होणे आवश्यक – विजय मुळीक
सूर्यकांत जोशी कुडाळ – कोणताही पुरस्कार हा प्रेरणा देणारा असतो. परंतु बक्षीस अथवा पुरस्कारा पेक्षा आपला गाव, आपले कुटुंब शैक्षणिक, आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण व समृद्ध होण्यासाठी स्पर्धातील गावांचा आदर्श घेऊन सर्वच गावे समृद्ध होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन अहिल्या नगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी केले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जावली तालुक्यातील कावडीचे विभागस्तरीय मूल्यमापन अहिल्या नगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली कमिटीने सूक्ष्म मूल्यमापन केले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य वसंतराव मानकुमरे यांच्या संकल्पनेतून जावली तालुक्यातील कावडी येथे राबवण्यात आलेल्या विविध समाजाभीमुख उपक्रमांची पाहणी करून या समितीने प्रशंसा केली.प्रारंभी स्थायी समितीचे विद्यमान सदस्य मा. वसंतरावजी मानकुमरे ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात विभागीय मूल्यमापन कमिटी सदस्याचे स्वागत करण्यात आले. या वेळी समितीने या अभियानात राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी मूल्यमापन समितीच्या अध्यक्षानी कावडी गावाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून निश्चितपने कावडी गाव विभागीय स्तरावर यश मिळवेल असा आशावाद व्यक्त केला. या मूल्यमापन सोहळ्यात जावळीचे माजी आमदार मा. सदाशिव सपकाळ, जि . प. सदस्य मच्छिंद्र क्षीरसागर,उपसभापती गोरख महाडिक, मा.उपसभापती रवींद्रजी परामने, भाजपा अध्यक्ष संदीपजी परामने, प्रमोदजी पवार, विकास धोंडे, राजू गोळे, मारुती शिर्के ,अमोल भिलारे, मा. अध्यक्ष श्रीहरी गोळे, पंचक्रोशीतील सर्व गावाचे सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, बचत गटाचे बहुसंख महिला भगिनी, आणि विशेष ज्यांच्या परिश्रमामुळे कावडी गावचा कायापालट झाला. तसेच प्रशासकीय कामात विशेष योगदान देणारे कावडी गावचे सरपंच, यशवंत मानकुमरे,पोलिस पाटील प्रमोदजी मानकुमरे, उपसरपंच शशिकांत मानकुमरे ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्था, बचत गट, तरुण मंडळे,ग्रामसेवक, मंगेश शिंदे मुख्याध्यापक,शिक्षक, अंगणवाडी शिक्षिका, कावडी गावचे समस्त ग्रामस्थ, मुंबई कर ग्रामस्थ या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे हे अभूतपूर्व यश मिळाले आहे. या सोहळ्यानंतर सर्वांना कावडी ग्रामस्थांच्या वतीने उत्कृष्ट स्नेहभोजन देण्यात आले*.