Monday, April 6, 2026
HomeTop Newsमुलींनी स्वसंरक्षणासाठी आत्मनिर्भर होणे आवश्यक - डॉ.शीतल जानवे

मुलींनी स्वसंरक्षणासाठी आत्मनिर्भर होणे आवश्यक – डॉ.शीतल जानवे

सूर्यकांत जोशी कुडाळ – कोणतीही घटना घडल्यानंतर परिणामांची कारणमिमांसा करण्यापेक्षा कोणतीही घटना घडूच नये याची खबरदारी घेतली पाहिजे.आणि तशी वेळ आलीच तर अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षणासाठी आत्मनिर्भर झाले पाहिजे असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी. डॉ.शीतल जानवे यांनी केले .

                कुडाळ ता. जावली येथे महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पांतर्गत जावली तालुक्यातील विविध शाळांमध्ये देण्यात जेआलेल्या प्रशिक्षणाच्या समारोप समारंभात डॉ.जानवे बोलत होत्या.

          जेष्ठ, महिला,मुली असाह्य व्यक्तींचे सदरक्षण करणे पोलीसांचे कर्तव्यच आहे. 

गेल्या वर्षभरात अल्पवयीन मुलींवर होणार्या अत्याचाराच्या घटना पाहुन राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे.या माध्यमातून मुली स्वसंरक्षणासाठी आत्मनिर्भर बनतील.जिल्ह्यातील अकरा एकतालुक्यातील ३३०० विद्यार्थ्यीनींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.ज्यांनी हे प्रशिक्षण घेतले आहे त्यांनी तोच वसा पुढे चालवावा असे आवाहन डॉ जानवे यांनी केले.

                  स.पो.नि.अमोल माने  म्हणाले,मुलींवर वाढते अत्याचार पाहता मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे आवश्यक होते. त्यानुसार जावली तालुक्यात महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आला.असाच उपक्रम विविध शाळांमध्ये राबवला जावा . 

       या प्रशिक्षणासाठी सपोनि. अमोल माने  सपोनि मेणकर मॅडम यांच्याबरोबरच संपूर्ण मेढा  पोलीस स्टाफ गेले अनेक दिवस विविध शाळांमध्ये कराटे ट्रेनर कु. प्रीती गोंधळी यांचे प्रशिक्षण कार्यक्रम घेत आहेत अशी माहिती महेश पवार यांनी दिली.

     यावेळी सर्व ए पी आय मेणकर, कुडाळ पोलीस दूरक्षेत्राचे अंमलदार इम्रान मेटकरी , उपसरपंच सोमनाथ कदम ,अविनाश गोंधळी सर ,महेश पवार , महेश कदम उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश पवार यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page